जपानमधील क्युशूमध्ये सोमवारी (दि.१३) रोजी भूकंपाचे जबरदस्त धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर या धक्क्यांची तीव्रता ६.९ इतकी होती. देशाच्या हवामान संस्थेच्या हवाल्याने असोसिएटेड प्रेसने ही माहिती दिलेली आहे. अधिकाऱ्यांनी अनेक भागांसाठी त्सुनामी चेतावणी जारी केलेली असली तरी यात कोणतेही नुकसान किंवा जीवितहानी झालेली नसल्याचं सांगण्यात आलं आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, युरोपीयन भूमध्य भूकंप विज्ञान केंद्राने दिलेल्या माहितीनुसार क्युशूमध्ये जाणवेलेल्या भूकंपाची खोली ही ३७ किलोमीटर होती. NERV या जपानच्या भूकंप मॉनिटरिंग एजन्सीने सांगितलं की, हा भूकंप ह्युगा-नाडा समुद्रात झाला. मियाझाकी प्रांतात स्थानिक वेळेनुसार रात्री ९:२९ वाजता हा भूकंप झाला. सर्वाधिक प्रभावित भागात त्याची तीव्रता 0 ते 7 च्या जपानी स्केलनुसार 5 पेक्षा कमी होती. जवळच्या कोची प्रीफेक्चरसाठी त्सुनामीचा इशाराही देण्यात आला होता.
दरम्यान, जगाला सतत भूकंपाचे धक्के बसत असून याआधी गेल्या वर्षी ८ ऑगस्टला जपानमध्ये ६.९ आणि ७.१ रिश्टर स्केलचे दोन शक्तिशाली भूकंप झाले होते. या भूकंपाने दक्षिण-पश्चिमेकडील क्युशू आणि शिकोकू बेटांना हादरवले होते. यावेळी झालेल्या प्रचंड विध्वंसात १२६ लोकांचा मृत्यू झाला होता. तर अनेक घरांचं देखील नुकसान झालं होतं.
यात ३०० हून अधिक लोक त्यावेळी जखमी झाले होते. या भूकंपाचा परिणाम भारतातही दिसून आला होता. तिबेटच्या टिंगरी परगण्यात केंद्रस्थानी असलेल्या या भूकंपामुळे मोठ्या प्रमाणात घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. संपूर्ण परिसरात इमारती हादरू लागल्यानंतर त्याचे हादरे भारत, नेपाळ आणि भूतानमध्येही जाणवले होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.