Stray dogs attack 4 year old girl in Moradabad : मागील काही दिवसांपासून मुंबई, पुणे, दिल्लीसह देशात भटक्या कुत्र्यांची दहशत मोठ्या प्रमाणात वाढली आहे. दररोज कुठे ना कुठे या झुंडींच्या हल्ल्यात मुलं, महिला अन् वृद्ध माणसे जखमी होतात. पुणे, मुंबई, दिल्लीसारख्या महानगरांमध्ये हा विषय अत्यंत गंभीर झालाय. उत्तर प्रदेशमधून असाच एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. मुरादाबादमध्ये एका ४ वर्षाच्या मुलीचा भटक्या कुत्र्यांनी जीव घेतलाय. मुलीच्या अंगाचे लचके तोडले. या घटनेमुळे कुटुंबियांना दुःख झाले आहे.
मोकाट कुत्र्यांनी ४ वर्षाच्या मुलीला घराबाहेरून ओढत नेलं अन् अंगाचे लचके तोडले. यामध्ये तिचा मृत्यू झालाय. चिमुकली घराबाहेर मित्रांसोबत खेळत होती. त्याचवेळी मोकाट कुत्र्यांचा झुंड आला. त्यांनी मुलीला ओढत ओढत तलावाकडे नेले. तिथे तिच्या अंगाचे लचके तोडले. हात-पाय अन् तोंड-मान सगळ्या अंगावर चावे घेतले. वेदना असाह्य झाल्यामुळे मुलीने जागेवरच प्राण सोडले.
मुरादाबादधील काझीपुरा भागात ही धक्कादायक घटना घडली. काझीपुरा गावातील सोनार नौशाद यांची चार वर्षांची मुलगी नुसरत घराबेहर मुलांसोबत खेळत होती. त्यावेळी परिसरातील भटक्या कुत्र्यांच्या झुंडाने तिला ओढत नेलं. कुत्र्यांनी अचानक केलेल्या हल्ल्यामुळे सोबत खेळणारी मुले पळून केली. पण नुसरतला आपली सुटका करता आली नाही. नरभक्षक कुत्र्यांच्या झुंडाने निष्पाप नुसरतला जवळच्या तलावात ओढले आणि ओरबाडले.
दिवस मावळला, अंधार पडला तरी मुलगी घरी आली नाही, त्यामुळे कुटुंबाकडून शोध घेण्यात आला. शोधाशोध करत वडील नैशाद अन् काही लोक तलावाजवळ पोहचले. तेथील दृश्य पाहिल्यानंतर प्रत्येकाच्या पायाखालची जमीन सरकली. आपण पाहतोय, ते खरे आहे, यावर कुणाचाही विश्वास बसला नाही, सर्वजण हादरले होते. कारण, अर्धा डझन कुत्रे नुसरतचे लचके तोडत होते. नुसरतच्या अंगातून मोठ्या प्रमाणात रक्त येत होते, ती बेशुद्ध अवस्थेत होती. लोकांनी तात्काळ कुत्र्यांना हुसकावले. जखमी अवस्थेतील नुसरताला रूग्णालयात दाखल कऱण्यात आले. पण तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.