भारतीय विद्यार्थ्यांची खार्किव रेल्वे स्थानकावर युक्रेन पोलिसांकडून दमनशाही Saam TV
देश विदेश

भारतीय विद्यार्थ्यांची खार्किव रेल्वे स्थानकावर युक्रेन पोलिसांकडून दमनशाही

युक्रेनच्या इतर शहरांमध्ये अडकलेले विद्यार्थी टॅक्सीने खार्किव रेल्वे स्टेशनवर पोहोचत आहेत.

वृत्तसंस्था

युद्धग्रस्त ईशान्य युक्रेनच्या खार्किव शहरात मंगळवारी झालेल्या गोळीबारात एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. 21 वर्षीय नवीन शेखरप्पा, कर्नाटकचा रहिवासी आहे. आवश्यक साहित्य आणण्यासाठी एका दुकानाबाहेर उभा होता. त्यादरम्यान तो रशियन सैनिकांच्या गोळीबाराचा बळी ठरला.

दरम्यान, या हल्ल्यातून वाचण्यासाठी बाहेर पडणाऱ्या भारतीय नागरिकांना युक्रेन पोलिसांकडून त्रास सहन करावा लागत असल्याचे वृत्त आले आहे. खार्किव रेल्वे स्थानकावर मोठ्या संख्येने उभ्या असलेल्या विद्यार्थ्यांना ट्रेनमध्ये चढू दिले जात नसल्याचे माध्यमाला सांगण्यात आले. युक्रेनचे पोलीस प्रथम नागरिकांना बाहेर काढत आहेत.

वास्तविक, युक्रेनच्या इतर शहरांमध्ये अडकलेले विद्यार्थी टॅक्सीने खार्किव रेल्वे स्टेशनवर पोहोचत आहेत. युक्रेनचे हवाई क्षेत्र बंद झाल्यामुळे, भारत तिथे अडकलेल्या आपल्या नागरिकांना पोलंड, हंगेरी आणि रोमानिया (युक्रेनची सीमा) या शेजारील देशांमधून एअरलिफ्ट करुन परत आणत आहे. 'ऑपरेशन गंगा' मिशनअंतर्गत आतापर्यंत 1396 भारतीयांना सहा विमानांद्वारे मायदेशी आणण्यात आले आहे.

तसेच, भारतीय नागरिकांनी संकटग्रस्त युक्रेनमधून लवकरात लवकर बाहेर पडावे, असा सल्लाही परराष्ट्र मंत्रालयाकडून देण्यात आला आहे. भारतीय विद्यार्थ्यांनी तात्काळ युक्रेन सोडावे, असं आठवडाभरापूर्वी अॅडव्हायझरीत म्हटलं होतं. विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी अतिरिक्त उड्डाणेही चालवण्यात आली आहेत. मात्र, आता कोणत्याही परिस्थितीत युक्रेनमधून बाहेर पडण्याचा प्रत्येकजण प्रयत्न आहेEf

शिवाय, रशिया आणि युक्रेनचे सामरिकदृष्ट्या महत्त्वाचे असणारे खार्किव आणि राजधानी कीववर रशियाकडून मोठे हल्ले होऊ शकतात, असा दावा तज्ज्ञांनी केला आहे. हे पाहता रहिवाशांना बंकरमध्ये लपून राहण्याचा किंवा तात्काळ शहर सोडण्याचा सल्ला दिला जात आहे.

याशिवाय, मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारीच 1500-1600 हून अधिक विद्यार्थ्यांना कीवमधून ट्रेनसाठी बाहेर काढण्यात आले आहे. त्याच वेळी, कीववर हल्ला सुरु झाल्यामुळे नागरिकांना येथून बाहेर पडणे अशक्य होणार असल्याचे देखील सांगण्यात येत आहे. दरम्यान, खार्किवपासून युक्रेनच्या सीमावर्ती भागात प्राइव्हेट वाहनांमधून वाहतूक केली जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रशियन सैन्याने खार्किववर ताबा मिळवला आहे. मात्र युक्रेनने हे वृत्त निराधार असल्याचे म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Palghar News: संपानं घेतला चिमुकलीचा जीव; उपचाराअभावी २ वर्षीय मुलीचा मृत्यू,शासकीय रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

Raj Thackeray : राज ठाकरे महाविकास आघाडीत येणार? महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग, मातोश्रीच्या बैठकीत काय घडलं? VIDEO

Israel Airstrike: गाझा-युद्धविरामची चर्चा सुरू असतानाच इस्रायलचा कतरमध्ये हवाई हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Government: शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज; रस्त्यावरून होणारी कटकटी अन् भांडणं मिटणार, शेतापर्यंत होणार रस्ता

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा भूकंप; दसऱ्यानंतर ठाकरे गट फुटणार? VIDEO

SCROLL FOR NEXT