Mizoram Stone Mine Accident Saam Tv
देश विदेश

Mizoram Stone Mine Accident: मिझोराममध्ये मुसळधार पावसाचा कहर; दगडाची खाण कोसळल्याने १० जणांचा मृत्यू, अनेक घरं जमीनदोस्त

Stone Mine Collapse In Mizoram: मिझोराममध्ये दगडाची खाण कोसळल्याने १० जणांचा मृत्यू झाला आहे. घरांचंही मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे.

Rohini Gudaghe

मिझोराममध्ये आज सकाळी एक मोठी दुर्घटना घडली. रेमल चक्रीवादळामुळे सतत पाऊस सुरू आहे. त्यामुळे मिझोरामध्ये दगडाची खाण कोसळल्याने दहा जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक लोक ढिगाऱ्याखाली दबले गेल्याची माहिती मिळतेय. पावसादरम्यान ढिगाऱ्याखालून काही मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. मुसळधार पावसामुळे बचावकार्यात अडचणी येत आहेत.

मिझोराममध्ये एका खाणीत भीषण अपघात (Mizoram Stone Mine Accident) झाला आहे. दगडाची खाण कोसळल्याने १० जणांचा मृत्यू झाला आहे. अपघातानंतर सुरू करण्यात आलेल्या बचाव मोहिमेत दोन जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं आहे. अनेक मजूर अजूनही ढिगाऱ्याखाली अडकले असून, त्यांना वाचवण्यासाठी शोधमोहीम राबवली जात ( Accident News) आहे.

ही दुर्घटना मिझोरामची राजधानी आयझॉलमध्ये झाला आहे. रेमल चक्रीवादळामुळे येथे याअगोदर देखील मोठ्या प्रमाणात विध्वंस पाहायला मिळाला आहे. २८ मे म्हणजेच आज सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास (Stone Mine Collapse In Mizoram) आयझॉलच्या मेल्थम सीमेवर दगडाची खाण कोसळली. खाण कोसळल्यामुळे आजूबाजूची अनेक घरे देखील उद्ध्वस्त झाल्याची माहिती आज तकच्या हवाल्यानुसार मिळत आहे.

राज्यात देखील अनेक ठिकाणी अवकाळी पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी वीज पडून लोकांचा मृत्यू झालाय. अनेक ठिकाणी मोठमोठी झाडं उन्माळून पडली आहेत. वादळी वाऱ्यामुळे (Heavy Rain) घरांचं नुकसान झालंय तर अनेक ठिकाणी फळबागा देखील जमीनदोस्त झाल्या आहे. फक्त राज्यातच नाही तर मिझोराममध्ये देखील आता वादळी पावसाचं थैमान दिसून येत आहे.  बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या रेमल चक्रीवादळामुळे ईशान्य भारतात मुसळधार पाऊस पडत असल्याचं दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mangal Gochar 2025: सप्टेंबर महिन्यात पालटणार 'या' राशींचं नशीब; मंगळाच्या गोचरने होणार लाभ

Maharashtra Live News Update: संगमेश्वर माखजन बाजारपेठेला पुन्हा एकदा पुराचा धोका

Ganeshotsav 2025: यंदा गणेशोत्सव कधी आहे? जाणून घ्या तारीख

Khopoli Ghat Traffic : खोपोली घाटात १०० हून अधिक कार थांबल्या, जाणून घ्या धक्कादायक कारण

Mobile Deals: ३००० पेक्षा कमी किंमतीत मोबाईल फोन, YouTube आणि JioHostar पाहण्याची देखील सुविधा

SCROLL FOR NEXT