Gujarat News Saam Tv
देश विदेश

Gujarat News: सुरत रेल्वे स्थानकावर दिवाळीत घरी जाणाऱ्यांची मोठी गर्दी; ट्रेन पकडताना चेंगराचेंगरी, एकाचा मृत्यू

Surat News: सुरत रेल्वे स्थानकावर दिवाळीत घरी जाणाऱ्यांची मोठी गर्दी; ट्रेन पकडताना चेंगराचेंगरी, एकाचा मृत्यू

Satish Kengar

Gujarat News:

गुजरातमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. येथे सुरत रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी होऊन एकाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. गेल्या दोन दिवसांपासून दिवाळी आणि छठला घरी जाणाऱ्यांची मोठी गर्दी स्टेशनवर पाहायला मिळत आहे.

शनिवारीही स्थानक प्रवाशांनी भरले होते. दरम्यान, बिहारकडे जाणारी ट्रेन पकडण्यासाठी प्रवाशांची एकच झुंबड उडाली आणि चेंगराचेंगरी झाली. यादरम्यान एक व्यक्ती बेशुद्ध झाली आणि नंतर त्याचा मृत्यू झाला. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मिळालेल्या माहितीनुसार, या चेंगराचेंगरीदरम्यान अनेक जण पडून जखमीही झाले आहेत. मृत हा छपरा येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. वीरेंद्र कुमार असे त्याचे नाव आहे. वीरेंद्र सुरतमध्ये नोकरीसाठी राहत होता. बेशुद्ध झाल्यानंतर त्याला तात्काळ जवळच्या रुग्णालयात नेले असता त्याला मृत घोषित करण्यात आले. चेंगराचेंगरीत अनेक प्रवासी बेशुद्ध पडले आणि त्यांना तेथे उपस्थित आरपीएफ अधिकाऱ्यांनी सीपीआर देऊन वाचवले, असं सांगण्यात येत आहे.  (Latest Marathi News)

ट्रेनमध्ये चढण्यासाठी प्रवाशांनी केली होती गर्दी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवाशांनी ताप्ती गंगा एक्स्प्रेसमध्ये चढण्यासाठी गर्दी केली होती, त्यावेळीच स्टेशनवर चेंगराचेंगरी झाली. यात तीन ते चार जण बेशुद्ध पडले. वीरेंद्र कुमार हे देखील त्यापैकीच एक होते. सर्वांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी वीरेंद्रला मृत घोषित केले. शवविच्छेदनानंतर मृत्यूचे खरे कारण समजेल, असं पोलिसांनी सांगितलं आहे.

दरम्यान, दिवाळी आणि छठच्या पार्श्वभूमीवर गुजरातमधील सर्वच स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी असते. मिळालेल्या माहितीनुसार, प्रतीक्षा यादीही 300 च्या पुढे गेली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Solapur : दिलदार सोनू सूद सोलापुरात येणार, पूरस्तांना दिला मदतीचा हात | VIDEO

Maharashtra Live News Update: पंढरपुरात चंद्रभागाने इशारा पातळी गाठली; नदीकाठी पूरस्थिती

BMC Elections : मुंबईसाठी एकनाथ शिंदेंचा ठाणे पॅटर्न, BMC जिंकण्यासाठी शिवसेनेनं काय आखला प्लान? | VIDEO

Maharashtra Flood : पुराने होत्याचं नव्हतं केलं, २ वर्षांची मुलगी अन् १० वर्षांचा मुलगा गेला वाहून, संभाजीनगरवर शोककळा

Mumbai Crime : स्विमिंग पूलमध्ये अल्पवयीन २ मुलींवर लैंगिक अत्याचार, दादरमधील धक्कादायक घटना

SCROLL FOR NEXT