अॅमेझॉनच्या ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलमधील बेस्ट डीलमध्ये तुम्ही आयफोन किंवा वनप्लस स्मार्टफोन खरेदी करायचा राहून गेला असेल तर, निराश होण्याची गरज नाही. Amazon India वर सेल संपल्यानंतरही, iPhone 13 (128GB) आणि OnePlus 11R 5G MRP पेक्षा खूपच कमी किमतीत उपलब्ध आहेत.
तुम्ही एक्सचेंज ऑफरमध्ये 45 हजार रुपयांपर्यंतच्या सूटसह हे स्मार्टफोन ऑर्डर करू शकता. सेलमध्ये कंपनी या फोन्सवर आकर्षक बँक डिस्काउंट देखील देत आहे. चला तर मग या दोन्ही हँडसेटवर दिल्या जाणाऱ्या ऑफर्सबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
iPhone 13 (128GB)
Amazon India डीलमध्ये, iPhone 13 चा 128 GB व्हेरिएंट 14 टक्के डिस्काउंटसह उपलब्ध आहे. डिस्काउंटनंतर याची किंमत 59,900 रुपयांवरून 51,499 रुपयांवर आली आहे. बँक ऑफरमध्ये तुम्ही या फोनची किंमत आणखी 1,000 रुपयांनी कमी करू शकता. एक्सचेंज ऑफरमध्ये हा फोन 45 हजार रुपयांपर्यंत स्वस्त होऊ शकतो. तुम्ही हा आयफोन आकर्षक EMI ऑफरमध्ये देखील खरेदी करू शकता. (Latest Marathi News)
फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, कंपनी या फोनमध्ये 6.1 इंचाचा सुपर रेटिना XDR डिस्प्ले देत आहे. फोटोग्राफीसाठी, फोनमध्ये 12-मेगापिक्सलचा वाईल्डआणि 12-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड अँगल कॅमेरा आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये 12 मेगापिक्सलचा ट्रूडेप्थ कॅमेरा देत आहे. हा फोन A15 Bionic चिपसेटवर काम करतो.
OnePlus 11R 5G
8 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज असलेला हा फोन 39,999 रुपयांना सेलमध्ये उपलब्ध आहे. बँक ऑफरमध्ये याची किंमत 2 हजार रुपयांनी कमी केली जाऊ शकते. कंपनी या फोनवर 29,550 रुपयांची सूटही देत आहे. याशिवाय, तुम्ही OnePlus चा हा फोन 1939 रुपयांच्या EMI वर खरेदी करू शकता. फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर फोनमध्ये 2772x1240 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.7 इंचाचा डिस्प्ले आहे. हा डिस्प्ले 120Hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो.
OnePlus चा हा फोन Snapdragon 8+ Gen 1 चिपसेट सह येतो. फोटोग्राफीसाठी कंपनी या फोनमध्ये 50 मेगापिक्सलचा ट्रिपल कॅमेरा सेटअप देत आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये 16-मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. फोनमध्ये दिलेली बॅटरी 5000mAh आहे. ही बॅटरी 100W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर असलेल्या या फोनमध्ये कंपनी Android 13 वर आधारित OxygenOS ऑफर करत आहे.
डिस्क्लेमर: आम्ही ही बातमी ई-कॉमर्स वेबसाइट्सवर दिलेल्या एक्सचेंज ऑफर आणि सवलतींच्या आधारे तयार केली आहे. एक्सचेंज ऑफर गॅझेटच्या स्थितीवर अवलंबून असतात. अशा परिस्थितीत, कोणतेही गॅझेट खरेदी करण्यापूर्वी, त्याची किंमत निश्चितपणे तपासा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.