Diwali Guidelines 2023: रात्री १० नंतर फटाके फोडाल तर खबरदार; अन्यथा होईल मोठी कारवाई
Diwali Guidelines 2023:
मुंबईतील वायू प्रदुषणाच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने दिवाळीमध्ये फटाके फोडण्यासाठी वेळेची मर्यादा घालून दिली आहे. दिवाळीत फटाके फोडणाऱ्यांना रात्री ८ ते १० या वेळेतच फटाके फोडण्याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत. त्यानुसार आज शनिवारपासून रात्री १० नंतर फटाके फोडणाऱ्यांना आता पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. (Latest Marathi News)
दिवाळी सणात रात्री दहानंतर फटाके फोडण्यावर मर्यादा आणल्या आहेत. त्यानुसार रात्री १० नंतर फटाके फोडल्यास पोलिसांकडून १८८ अंतर्गत कारवाई केली जाणार आहे. तसेच संबंधित व्यक्तीला ४१(अ) नुसार नोटीस बजावली जाणार आहे. त्याचबरोबर त्यांचे फटाकेही जप्त केले जाणार आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
रात्री दहा वाजल्यानंतर संबधित व्यक्तीला न्यायालयात हजर केल्यास न्यायालयाकडून जी शिक्षा देण्यात येईल, त्याची पोलीस अंमलबजावणी करणार आहे. त्याचबरोबर दुसरीकडे पोलिसांकडून ५ हजार रुपये दंडात्मक कारवाईही केली जाऊ शकते. (Mumbai Latest news)
कोणते फटाके फोडू नयेत?
ध्वनी, वायू प्रदुषणाच्या पार्श्वभूमीवर प्रदूषणास कारणीभूत ठरणारे फटाके वाजवू नयेत, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे. मोठ्या डेसीबलच्या पातळीचे फटाके उत्पादन, विक्रीसोबत ते वाजवणाऱ्यांवरही पोलिसांकडून कारवाई केली जाऊ शकते.
परवाना नसताना फटाक्यांची विक्री
मुंबईत फटक्यांची विक्री परवाना नसताना होत असल्याने नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यासोबत विक्रेत्यांकडेही फटक्यांच्या सुरक्षेबाबत शाश्वती नसते. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांकडून विना परवाना फटाके विक्री करणाऱ्यांवर कारवाई केली जाऊ शकते.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांचं मुंबईकरांना आवाहन
वायू प्रदूषण नियंत्रणाचा भाग म्हणून दिवाळी सणामध्ये सायंकाळी ८ ते रात्री १० यावेळेत फटाके फोडण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत. या पार्श्वभूमीवर सर्व मुंबईकरांनी निर्देशांचे पालन करावे, त्याचबरोबर कमीत कमी वायू आणि ध्वनी प्रदूषण करणारे फटाके फोडावेत, असे आवाहन मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल यांनी मुंबईकरांना केलं आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.