SSB Constable Recruitment 2023 Saam Tv
देश विदेश

SSB Constable Recruitment 2023: देशसेवेचे स्वप्न होणार पूर्ण! SSB मध्ये कॉन्स्टेबल पदासाठी मोठी भरती, तात्काळ करा अर्ज

Government Job : सशस्त्र सीमा बल अर्थात एसएसबीने कॉन्स्टेबल ट्रेडसमन पदाच्या भरतीसाठी (SSB Constable Recruitment 2023) अधिकृत अधिसूचना जारी केली आहे.

Priya More

SSB Recruitment: सरकारी नोकरीच्या शोधात (Government Job) असणाऱ्या आणि देशसेवा करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. त्यांचे देशसेवेचे हे स्वप्न पूर्ण होणार आहे. सशस्त्र सीमा बल अर्थात एसएसबीने कॉन्स्टेबल ट्रेडसमन पदाच्या भरतीसाठी (SSB Constable Recruitment 2023) अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार ज्यांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे ते एसएसबीची अधिकृत वेबसाईट ssbrectt.gov.in ला भेट देऊन अर्ज करु शकतात.

इतक्या पदांसाठी भरती -

केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अंतर्गत सशस्त्र सीमा बल यांनी विविध ट्रेडमध्ये कॉन्स्टेबल ट्रेड्समनच्या 543 पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत सुतार, लोहार, ड्रायव्हर, शिंपी, माळी, मोची, पशुवैद्यकीय, पेंटर, वॉशरमन, न्हावी, सफाईवाला, स्वयंपाकी आणि जलवाहकांच्या पदासाठी भरती केली जाणार आहे. या पदांसाठीची भरती तात्पुरती असेल परंतु ती पुढे वाढवता येईल.

अर्ज करण्याची तारीख -

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणारे उमेदवार ssbrectt.gov.in या अधिकृत भरती पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आलेल्या ऑनलाइन अर्जाद्वारे अर्ज करू शकतात. एसएसबीने या भरती जाहिरातीमध्ये अर्ज प्रक्रिया सुरू होण्याच्या तारखेबद्दल माहिती दिलेली नाही. 13 मे 2023 रोजी प्रकाशित झालेल्या ताज्या एम्पलॉयमेंट बातम्यांमध्ये जाहिरात प्रकाशित होताच अधिकृत भरती पोर्टलवर देखील अर्ज प्रक्रिया सुरू झाली. उमेदवार जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 30 दिवसांच्या आत अर्ज करू शकतात.

शिक्षण आणि वयोमर्यादा -

या भरती प्रक्रियेसाठी फक्त तेच उमेदवार अर्ज करू शकतात ज्यांनी मान्यताप्राप्त बोर्डातून मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण केली आहे आणि रिक्त पदांशी संबंधित ट्रेडमध्ये प्रमाणपत्रे मिळविली आहेत. तसंच किमान दोन वर्षे संबंधित कामाचा अनुभव आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 वर्षांपेक्षा कमी आणि 27 वर्षांपेक्षा जास्त नसावे. तर अनेक पदांसाठी कमाल वयोमर्यादा 23 आणि 25 वर्षे देण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maratha-OBC Quota Row: ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंविरोधात पोलिसात तक्रार दाखल; काय आहे कारण?

Chandra Grahan Tips : ग्रहणाच्या वेळी अन्न दूषित होऊ नये यासाठी सोपा उपाय

Anant Chaturdashi 2025 live updates : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मिरवणूक रथात विराजमान

Viral Video: शाळा आहे की मसाज पार्लर! शिक्षकाने विद्यार्थिनींकडून करून घेतली बॉडी मसाज, VIDEO पाहून तुम्हालाही येईल राग

Aayush Komkar: शेवटी सूड घेतलाच! वनराजच्या अंत्यविधीला शस्त्रपूजन करत बदला घेण्याची शपथ, अन् १ वर्षाने आयुष कोमकरची हत्या

SCROLL FOR NEXT