Imran Khan News: इम्रान खान यांच्या घरात 20-30 दहशतवादी; पंजाब सरकारचा 24 तासांचा अल्टिमेटम

Imran Khan News: एकीकडे पोलिसांची बंदोबस्त वाढवल्यानंतर त्यांच्या समर्थकांची मोठी तिथे जमली आहे.
Pakistan Supreme Court orders
Pakistan Supreme Court orders saam tv

Pakistan News : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांच्या पंजाबमधील निवासस्थानी 20-30 दहशतवाद लपून बसल्याची माहिती समोर येत आहे. पंजाब सरकारने याबाबत पाकिस्तान तहरीक ए इंसाफ (PTI) पक्षाला केवळ 24 तासांचा सर्व दहशतवाद्यांना ताब्यात देण्याचा अल्टिमेटम दिला आहे.

पीटीआयने या दहशतवाद्यांना ताब्यात न दिल्यास पोलिस त्यांच्यावर कठोर कारवाई करतील, असं पंजाब सरकारचे मंत्री आमिर मीर यांनी सांगितलं. (Latest Marathi News)

दहशतावाद्यांबाबत पोलिसांना माहिती मिळताच इम्रान खान यांच्या जमान पार्क येथील घराबाहेर नाकाबंदी करण्यता आली आहे. मात्र एकीकडे पोलिसांची बंदोबस्त वाढवल्यानंतर त्यांच्या समर्थकांची मोठी तिथे जमली आहे. (Breaking News)

Pakistan Supreme Court orders
Air India Flight: दिल्लीवरुन सिडनीला जाणाऱ्या विमानात मोठी दुर्घटना, 7 प्रवासी जखमी; नेमकं काय घडलं?

पीटीआयचे प्रमुख इम्रान खान हे अनेक दिवसांपासून सातत्याने लष्करावर निशाणा साधत आहेत. जो गुप्तचर अहवाल समोर आला आहे तो अत्यंत धोकादायक आहे. इम्रान खान आणि त्यांच्या पक्षाचं कृत्य देशासाठी धोका असल्याचे आमिर मीर यांनी म्हटलं आहे.

Pakistan Supreme Court orders
Mumbai Diamond Theft: सलमान खानच्या बहिणीच्या घरात चोरी, हिऱ्याचे दागिने चोरांनी केले लंपास

इम्रान खान यांनी अटक होण्यापूर्वीच हल्ल्याची योजना आखली होती. 9 मे रोजी लष्कराच्या ठिकाणांवर झालेला हल्ला पूर्वनियोजित होता, असे मीर म्हणाले. सरकारने अशा घटनांबाबत झिरो टॉलरन्सचे धोरण स्वीकारले आहे. दरम्यान पंजाबचे हंगामी मुख्यमंत्री मोहसीन नक्वी यांनी पंजाब पोलिसांना जाळपोळ करणाऱ्यांना कारवाईसाठी खुली सूट दिली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com