Lata Mangeshkar Saam Tv
देश विदेश

Lata Mangeshkar: लता दीदींनी श्रीलंकन नागरिकांच्या हृदयात अढळ स्थान निर्माण केलं : पंतप्रधान महिंदा राजपक्षे

आज गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे मुंबईत निधन झालं. देशासह विदेशातून त्यांना आदरांजली वाहिली जात आहे.

साम न्यूज नेटवर्क

श्रीलंका : ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्या निधनानं संपूर्ण आशियावर परिणाम झाला आणि श्रीलंकाही त्याला अपवाद नाही अशी भावना श्रीलंकेचे लष्करप्रमुख जनरल शवेंद्र सिल्वा (Sri Lankan Army chief General Shavendra Silva) यांनी व्यक्त केली आहे. लष्करप्रमुख मनोज मुकुंद नरवणे (Army Chief Manoj Mukund Naravane) यांना पाठविण्यात आलेल्या शोक संदेशात जनरल सिल्वा लिहितात लता दीदींनी श्रीलंकेच्या लोकांच्या हृदयात एक अढळ स्थान निर्माण केलं आहे. तसेच मंगेशकर या महान हाेत्या, त्यांच्या सुरेल आवाजाने त्यांच्या स्मृती शतकानुशतके आपल्या मनात राहतील, असे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी ट्विट केले. याबराेबरच श्रीलंकेचे पंतप्रधान महिंदा राजपक्षे एस यांनी 'संगीत ही सार्वत्रिक भाषा आहे' या वाक्याला लता मंगेशकर यांनी जीव दिला अशी भावना व्यक्त केली आहे.

"लता मंगेशकर ज्यांनी छत्तीस पेक्षा जास्त भाषांमध्ये गाणी गायली होती आणि सुमारे तीस हजारहून अधिक गाणी रेकॉर्ड केली होती. त्यांनी काही (Sinhala songs) गाणी गाऊन श्रीलंकेचा (Sri Lanka) गौरव केला होता. सन 1950 आणि 1960 च्या उत्तरार्धात श्रीलंकेत ही गाणी रिलीज झाल्यानंतर लोकप्रिय झाली हाेती असं श्रीलंकेच्या लष्कराने नमूद केले आहे.

त्यांच्या (Lata Mangeshkar) संगीत परंपरेने संपूर्ण आशियावर प्रभाव टाकला आणि श्रीलंकाही त्याला अपवाद नाही. श्रीलंकेच्या संगीतप्रेमींच्या (Sri Lankan music-lovers) हृदयात आणि मनाला भिडणारा त्यांचा आवाज लोकांना मंत्रमुग्ध करतो आणि तो मधुर आवाज पिढ्यानपिढ्या गुंजत राहील. त्यांच्या आवाजाला सीमा नव्हती असं जनरल शवेंद्र सिल्वा (General Shavendra Silva) यांनी नमूद केले आहे. श्रीलंकेच्या लष्करप्रमुखांनी श्रीलंकेतील भारताचे उच्चायुक्त गोपाल बागले यांनाही शोकसंदेश पाठवला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT