Breaking News: सूर सम्राज्ञी कालवश; लता मंगेशकर यांचं निधन

वयाच्या ९२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Lata Mangeshkar
Lata MangeshkarSaam TV
Published On

मुंबई - मराठी आणि हिंदी सिनेमासृष्टीमधील ज्येष्ठ प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचे आज निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या ९२ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. लता मंगेशकर यांना कोरोनासोबतच न्यूमोनियाची देखील लागण झाली होती. त्यांच्यावर मुंबईमधील ब्रीच कँडी रुग्णालयात (Breach candy Hospital) उपचार सुरु होते. गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांची प्रकृतीत सुधारणा झाली होती. परंतु काल पुन्हा त्यांच्या प्रकृती खवल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होत. त्यानंतर आज रविवारी सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला.(Lata Mangeshkar Passes Away)

लता मंगेशकर यांचा जन्म २८ सप्टेंबर १९२९ मध्य प्रदेशच्या इंदूर शहरात झाला. त्यांचे वडील पंडित दीनानाथ मंगेशकर हे शास्त्रीय गायक तसेच नाट्यकलावंत होते. लता मंगेशकर या सर्वात ज्येष्ठ अपत्य. आशा, उषा, मीना आणि हृदयनाथ ही त्यांची लहान भावंडे आहेत. लता मंगेशकर यांनी पहिली मंगळागौर या चित्रपटासाठी प्रथम पार्श्वगायन केले आहे.

त्या भारताच्या हिंदी चित्रपटसृष्टीच्या ख्यातनाम गायक-गायिकांपैकी एक होत्या. हिंदी संगीतविश्वात त्यांना 'लता दीदी' म्हणून ओळखले जायचे. लता मंगेशकरांच्या कारकिर्दीची सुरुवात १९४२ मध्ये झाली आणि ती कारकीर्द सहा दशकांपेक्षा अधिक काळ टिकून आहे. त्यांनी ९८० पेक्षा अधिक हिंदी चित्रपटांची गाणी गायली आहे.

लता मंगेशकरांचे कुटुंब संगीतासाठी प्रसिद्ध असून, सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले, उषा मंगेशकर, मीना मंगेशकर आणि ख्यातनाम संगीतकार-गायक हृदयनाथ मंगेशकर ही त्यांची सख्खी भावंडे आहेत. लता मंगेशकरांचे वडील मास्टर दीनानाथ मंगेशकर हे मराठी नाट्य-संगीताचे प्रसिद्ध गायक होते.

लता मंगेशकर हे नाव 'गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्‌समध्ये १९७४ ते १९९१ च्या कालावधीत सर्वात जास्त ध्वनिमुद्रणांच्या (रेकॉर्डिंग्स) उच्चांकासाठी नोंदले गेले आहे. लतादीदींना भारतरत्न या देशातील सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. हा पुरस्कार त्यांना २००१ साली मिळाला होता. याशिवाय त्या दादासाहेब फाळके पुरस्कार आणि फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ऑफिसर ऑफ द लीजन ऑफ ऑनर यासह अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित झाल्या आहेत. लता मंगेशकर हे नाव 'गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्‌समध्ये १९७४ ते १९९१ च्या कालावधीत सर्वात जास्त ध्वनिमुद्रणांच्या (रेकॉर्डिंग्स) उच्चांकासाठी नोंदले गेले आहे. त्यांनी १९४८ ते १९७४ या काळात २५ हजार हून अधिक गाणी गायली आहेत.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com