Delhi News: गेल्या तीन वर्षांपासून संपूर्ण जगाची झोप उडवून टाकणाऱ्या कोरोनाने (Corona Virus) पुन्हा एकदा हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. भारतामध्ये कोरोना (India Corona Update) विषाणू पुन्हा वेगाने पसरत आहे.
अशामध्ये दिवसेंदिवस धडकी भरवणारी कोरोना रुग्णांची (Corona Patient) आकडेवारी समोर येत आहे. त्यामुळे नागरिकांच्या चिंतेत वाढ झाली आहे. नुकताच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Health Ministry) देशात नव्याने नोंद झालेल्या कोरोना रुग्णांची आकडेवारी जाहीर केली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत देशात कोरोनाचे 5,676 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर गेल्या 24 तासांत 21 कोरोनाबाधितांना आपला जीव गमवावा लागला आहे. नवीन आकडेवारीनुसार देशामध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत ती 37,093 वर पोहचली आहे. कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे केंद्रासोबतच राज्य सरकारच्या चिंतेत वाढ झाली आहे. त्यांच्याकडून आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत.
दिल्लीमध्ये सोमवारी 484 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर महाराष्ट्रामध्ये 328 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. सोमवारी देशामध्ये 21 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. अशाप्रकारे देशामध्ये आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 53,10,000 वर पोहोचली आहे.
तर देशामध्ये आतापर्यंत 4 कोटी 42 लाखांपेक्षा अधिक रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत भारतात कोविड लसीचे 220.66 कोटी डोस देण्यात आले आहेत. देशात सध्या कोरोना रुग्णांचा मृत्यूदर 1.19 टक्के आहे. तर रिकव्हरी रेट 98.73 टक्के ऐवढा आहे.
दरम्यान, महाराष्ट्रामध्ये सोमवारी 328 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. ज्यामुळे आतापर्यंतच्या राज्यातील एकूण सक्रीय कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत हा आकडा 81,50,257 वर पोहचला आहे. मुंबईमध्ये एका कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला. आतापर्यंत मुंबईमध्ये 1,48,460 कोरोना रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. सोमवारपासून मुंबईमध्ये सरकारी रुग्णालयांमध्ये मास्कचा वापर करणे अनिवार्य केला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.