Space News Saam Digital
देश विदेश

Space News: विश्वाचं मोठं रहस्य उलगडलं! या ग्रहाच्या चंद्राखाली आढळला महासागर

Astronaut Found New Sea: आपल्या सौरमालेतील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा ग्रह शनीच्या चंद्रांवर अनेक रहस्य दडलेली आहेत. मिमास असं या शनीच्या चंद्राचं नाव असून चंद्राच्या पृष्ठभागाखाली एक महासागर लपला असल्याचा अंदाज खगोल शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे.

Sandeep Gawade

Astronaut Found New Sea

आपल्या सौरमालेतील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा ग्रह शनीच्या चंद्रांवर अनेक रहस्य दडलेली आहेत. या ग्रहावर एक चंद्र आहे जो प्रसिद्ध चित्रपट मालिका 'स्टार वॉर्स' मध्ये दर्शविलेल्या 'डेथ स्टार'सारखा दिसतो. कारण त्याच्या पृष्ठभागावर मोठे खड्डे आहेत. मिमास असं या शनीच्या चंद्राचं नाव असून चंद्राच्या पृष्ठभागाखाली एक महासागर लपला असल्याचा अंदाज खगोल शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे.

शास्त्रज्ञ अंतराळातील रहस्य आणि विश्व निर्मितीता शोध घेतायेत. त्यामध्ये शनिचे दोन चंद्र (टायटन आणि एन्सेलाडस) आणि गुरूचे दोन चंद्र (युरोपा आणि गॅनिमेड) समाविष्ट होतो. आता यात शनिच्या आणखी एका चंद्राचा समावेश झाला आहे.

मिमासच्या कक्षेतील वैशिष्ट्ये पाहता, शास्त्रज्ञांनी दोन अंदाज व्यक्त केले आहेत. पहिली गोष्ट म्हणजे त्यावर एकतर बराच लांब बर्फाच्छादित गाभा असू शकतो किंवा त्याच्या कवचाखाली महासागर असू शकतो ज्यामुळे त्याचे बाह्य स्तर गाभ्यापासून स्वतंत्रपणे सरकू शकतात. नासाच्या कॅसिनी मोहिमेपासून शनिपर्यंतच्या हजारो प्रतिमांचे विश्लेषण केल्यानंतर शास्त्रज्ञांनी मिमासच्या कक्षीय गतीची पुनर्रचना केली.

(साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

समुद्र सुमारे 45 मैल खोलीवर

मिमास ज्या प्रकारे भ्रमण करतो त्यावरून त्याच्या पृष्ठभागाखाली महासागर असण्याची शक्यता आहे. मिमासच्या १५ मैल-जाड बर्फाळ आच्छादनाखाली ४५ मैल-खोल महासागर असण्याची शास्त्रज्ञांना खात्री आहे. मिमासच्या पृष्ठभागाखालील महासागराचे प्रमाण एकूण खंडाच्या निम्म्याहून अधिक असू शकते. तुलनेने, मीमासचा समुद्र नवीन मानला जात असून आम्ही तुम्हाला सांगतो की मिमासचा पृष्ठभाग बऱ्यापैकी तुटलेला आहे.

20 किलोमीटर मजबूत बर्फाखाली जीवसृष्टी?

हा महासागर सुमारे 25 दशलक्ष वर्षांपूर्वी तयार झाला असावा. अशा परिस्थितीत शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, जर हा अंदाज बरोबर असेल तर तिथे पाण्यात जीवसृष्टी सुरू होण्यास तितका वेळ नाही. गुरूचा चंद्र युरोपा आणि शनीचा एन्सेलाडसवर जीवसृष्टी असण्याची शक्यता अधिक मानली जाते. शनीचा चंद्र मिमास पुढच्या संशोधनासाठी किती महत्त्वाचा असू शकतो, हे भविष्यातील संशोधनातून स्पष्ट होईल, असेही शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. मिमासवर महासागर अस्तित्वात असण्याचे संकेत आहेत परंतु जीवसृष्टीच्या अस्तित्वाबावत कोणताही पुरावा मिळालेला नाही. मिमासवर जीवसृष्टी असली तरी ते 20 किलोमीटर मजबूत बर्फाखाली झाकलेली असेलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CHYD : कॉमेडीचा डॉन परत येतोय! 'चला हवा येऊ द्या २'मध्ये मराठमोळ्या अभिनेत्याची धमाकेदार एन्ट्री, पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: डोंबिवली रेल्वे स्टेशनवर एकादशी वारीचा पारंपरिक गजर

दारु पिऊन शिक्षकाचा शाळेतच विद्यार्थ्यांसोबत डान्स; व्हिडिओ पाहून राग अनावर होईल

Shirdi Sai Temple: विठू माऊली तू, माऊली जगाची...; आषाढीचा उत्साह शिर्डीत, फुलांनी सजले साई मंदिर

Thackeray Brothers : ठाकरेंच्या लढ्याला दक्षिणेचा पाठिंबा, थेट मुख्यमंत्र्यांनी केलं कौतुक, म्हणाले प्रेरणादायी...

SCROLL FOR NEXT