
26 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर दरम्यान वेळापत्रक विस्कळीत
लोणावळा बीव्हीटी यार्ड आणि कल्याण लोणावळा विभागातील अप यार्ड मध्ये प्री नॉन इंटरलॉकिंग आणि नॉन इंटरलॉकिंग कामासाठी 26 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर दरम्यान विशेष ट्राफिक पावर ब्लॉक घेण्यात येणार आहे
त्यामुळे पुणे मुंबई सह अन्य राज्यातून या मार्गावर धावणाऱ्या रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे
पुणे लोणावळा लोकल सेवा पुणे तळेगाव पर्यंत सुरू राहणार आहे
‘पुणे ग्रँड चॅलेंज टूर सायकल स्पर्धा-२०२६’ आणि सुरू असलेल्या डांबरीकरणामुळे सिंहगड घाटमार्ग २४ ते २६ नोव्हेंबरपर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत
गोळेवाडी चौक ते सिंहगड घाट हा मार्ग बंद राहणार असून पर्यटकांची तसेच पानशेत, खानापूर, डोणजे, आतकरवाडी परिसरातील वाहतूक प्रभावित होईल. नागरिकांनी डोणजे चौक–खडकवासला–किरकटवाडी–नांदेड सिटीमार्गे (एनएच-४८) पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे प्रशासनाने आवाहन केले.
- गोंदिया, भंडारा, नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यात ते जाहीर सभा घेणार आहेत
- शिंदे यांच्या शिवसेनेने बहुतांश ठिकाणी स्वबळावर उमेदवार उभे केले आहेत
- नागपूर जिल्ह्यात 13 ठिकाणी शिंदेंच्या शिवसेनेने भाजपला आव्हान दिले आहे
- पक्षाच्या उमेदवाराला बळ देण्यासाठी एकनाथ शिंदे आज पूर्व विदर्भात प्रचारात सहभागी होत आहेत
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार उज्वला थिटे यांनी सोलापूरच्या जिल्हा व सत्र न्यायालयात केले आहे अपील
उज्वला थिटे यांचा सुचकाची सही नसल्याने अर्ज झाला होता बाद,त्यानंतर अनगर निवडणूक झाली होती बिनविरोध
अनगर नगरपंचायत निवडणूक बिनविरोध ही बेकायदेशीर असून प्रशासनावर माजी आमदार राजन पाटील यांनी माझा अर्ज बाद केला असा आरोप उज्वला थिटे यांनी केला होता
या प्रकरणावर सध्या सोलापूरच्या जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी सुरु झाली असून निवडणूक अधिकारी, नूतन नगराध्यक्ष आणि आक्षेप घेणाऱ्या अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदे यांना आज न्यायालयात शपथ पत्र दाखल करून आपलं म्हणणं सादर करावं लागणार...
मध्य रेल्वेच्या जलंब जंक्शन वरून खामगाव कडे जाणाऱ्या रेल्वे मार्गाच्या बाजूला एक जीर्ण पाण्याची टाकी ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे रेल्वे रुळावर कोसळल्याने रेल्वेच्या विद्युत तारांसह रेल्वे मार्गाचे नुकसान झालं यामुळे मात्र खामगाव जलंब रेल्वे सेवा अनिश्चित काळासाठी ठप्प झाली आहे. खामगाव जलंब रेल्वे मार्गाच्या बाजूला एक जीर्ण पाण्याचे टाकी पाडण्याचं काम सुरू असताना ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे ही टाकी विरुद्ध दिशेला कोसळायचे ऐवजी रेल्वे रुळाच्या दिशेने कोसळली . यामुळे मात्र रेल्वेचे मोठे नुकसान झालं आहे सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. टाकी पडतानाचा व्हिडिओ साम टीव्ही च्या हाती लागला आहे.
सांगलीच्या जत मध्ये जत नगर परिषदेसाठी महाविकास आघाडीची प्रचाराचा शुभारंभ झाला आहे.राष्ट्रीय समाज पक्षाचे माजी मंत्री महादेव जानकर यांच्या उपस्थितीमध्ये महाविकास आघाडीच्या प्रचाराची सभा पार पडली आहे. या सभेला खासदार विशाल पाटील यांच्यासह माजी आमदार विक्रम सावंत देखील उपस्थित होते. काँग्रेसकडून या ठिकाणी नगराध्यक्ष पदासाठी सांगली बाजार समितीचे सभापती सुजय शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.भाजप,राष्ट्रवादी अजित पवार गट आघाडी,शिवसेना शिंदे पक्ष आणि महाविकास विकास आघाडी अशी चौरंगी लढत पार पडत आहे.
राज्यभर गाजलेल्या गोविंद बर्गे आत्महत्याप्रकरणी नर्तिका पूजा गायकवाड (रा.सासुरे,ता.बार्शी) हिची बार्शी सत्र न्यायालयाने आता जामीनवर मुक्तता केली आहे.
९ सप्टेंबरला लुखामसलाचे (ता.गेवराईचे) माजी उपसरपंच गोविंद जगन्नाथ बर्गे यांनी नर्तिका पूजा गायकवाड हिच्या सासुरे येथील घरासमोर स्वतःच्या गाडीत रिव्हॉल्व्हरने स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून घेऊन आत्महत्या केली होती. याप्रकरणी अटकेनंतर नर्तिका पूजा गायकवाड हिने बार्शी सत्र न्यायालयात अॅड.धनंजय माने यांच्या मार्फत जामीन अर्ज दाखल केला होता.
जामीन अर्जाची सुनावणीवेळी आरोपीचे वकील अॅड.धनंजय माने यांनी आपल्या युक्तिवादात पूजा गायकवाड हिला या प्रकरणात केवळ संशयावरून गुंतवलेले आहे.
मी कोणालाही मतदान करू सांगणार नाही.. पण आई शप्पथ सांगतो, कमळाला मतदान करू नका.. असे आवाहन राष्ट्रीय समाज पक्षाचे माजी मंत्री महादेव जानकर यांनी केले आहे.. कारण भाजपा जाती- जातीत भांडण लावणार पक्ष आहे.. आज एकनाथ शिंदे व अजित पवारांची काय अवस्था आहे.. तशी माझी झाली नाही,कारण मी भानगडी केल्या नाहीत.. असा टोला देखील महादेव जानकर यांनी लगावला आहे.. सांगलीच्या जत मध्ये महाविकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुजय शिंदे व उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित सभेमध्ये ते बोलत होते.
उत्तरेकडील थंड वाऱ्यांचे प्रवाह कमी झाल्याने राज्यात थंडी गायब झाली आहे. राज्यात ढगाळ आकाश झाले असून पावसाला पोषक हवामान तयार झालेय. कोकण, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांसह हलक्या पावसाची, तसेच राज्यातील किमान तापमानातील वाढ कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील कुरुंदवाड येथील विवाहित महिलेनं सासरच्या मंडळींकडून होत असलेल्या आर्थिक आणि मानसिक त्रासातून टोकाचं पाऊल उचललं आहे. कोल्हापुरात जिल्ह्यातील कुरुंदवाड इथल्या एका विवाहित महिलेला निवडणूक खर्चासाठी माहेराहून तब्बल 10 लाख रुपये घेऊन येण्याची मागणी करत तिचा छळ करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कौसर गरगरे असं आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी कौसर यांचा भाऊ अल्ताफ आवटी यांनी कुरुंदवाड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी कौसर यांचा पती, सासू- सासऱ्यासह जावेच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. कौसर यांचा सासरा राजमहंदर गरगरे कुरुंदवाड नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून आहे. त्यामुळे निवडणुकीत खर्च करण्यासाठी माहेराहून 10 लाख घेऊन येण्याची मागणी विवाहितेकडे केली जात होती. त्यासाठी, सासरच्या मंडळींकडून कौसर यांचा शारीरिक आणि मानसिक छळ केला. त्यामुळे, गुरुवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास कौसर यांनी घराच्या छताला गळफास घेऊन स्वत:चं आयुष्य संपवल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी तात्काळ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.
कोपरगावमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोरच भाजप अंतर्गत विखे - कोल्हे यांच्यातील राजकीय संघर्ष समोर आलाय.. भाजप उमेदवाराविरोधात उभे असलेले राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार काका कोयटे हे विखे पाटलांचे निकटवर्तीय मानले जातात.. त्यामुळे कोपरगावची जनता काका आणि त्यांचे आका अशा दोघांचाही बंदोबस्त करतील अशी टीका विवेक कोल्हे यांनी करत विखे पाटलांवर निशाणा साधला होता.. तर भाजप उमेदवाराच्या प्रचारार्थ आयोजित सभेत माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी देखील भर सभेत काका कोयटे यांचा उल्लेख करत विखे पाटलांना उद्देशून "पालकमंत्री साहेब, कुणाला किती पाठीशी घालायचे हे ठरवा " असे वक्तव्य केले.. तर कोल्हे यांच्या वक्तव्यांनी उद्विग्न झालेल्या विखे पाटलांनी मुख्यमंत्र्यांसमोरच आपला संताप व्यक्त केला.. तुम्ही मला आका म्हणा किंवा काही म्हणा मला त्याचं काही वाटत नाही.. आणि आकाच्या मनात काय आलं तर तो काय करू शकतो हे मी देखील करून दाखवू शकतो.. निवडणुकीत यश पाहिजे असेल तर संयम ठेवला पाहिजे.. वक्तव्य करताना काळजी घेतली पाहिजे.. आमच्या भाचीवर शंका मी घेत नाही.. मी शांत माणूस आहे, मामा सगळं सहन करतो.. निवडणूक जिंकण्यासाठीच मी येथे आलो आहे.. मुख्यमंत्र्यांचा शब्द खाली पडेल असं कोणतंही काम आम्ही करणार नाही असं म्हणतं विखे यांनी कोल्हे यांना अप्रत्यक्ष इशारा दिला आहे..
भंडाऱ्यात सुरू असलेल्या जलपर्यटन केंद्राच्या काही तक्रारी प्राप्त झालेले आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्याची चौकशी लावलेली आहे. चौकशीअंती त्या ठिकाणी जे काही चौकशांती चुकीचं असेल तर, कारवाई होईल. मात्र, मुख्यमंत्र्यांकडे याची तक्रार आल्यानं ते याची चौकशी करणार...असल्याची प्रतिक्रिया महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. भंडाऱ्यात वैनगंगा नदीच्या तीरावर जागतिक दर्जाच्या जलपर्यटन केंद्राचं काम सुरू आहे. मात्र, या कामांमध्ये मोठी अफरातफर करून कोट्यवधी रुपयांचे बिल उचल केल्याचा आरोप करून त्याची तक्रार शिवसेना ठाकरे गटाचे भंडारा जिल्हाप्रमुख संजय रेहपाडे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. यावरून आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलीय.
मावळ तालुक्यात नगराध्यक्ष पदाची सोडत निघतात उमेदवारांनी प्रचाराला प्रचंड वेग घेतला आहे. कमी वेळात जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या वापरत प्रचाराला केली सुरुवात. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांनी सर्वप्रथम रॅलीच्या माध्यमातून आणि नंतर डोअर टू डोअर प्रचार करायला सुरुवात केली आहे. मात्र लोणावळ्यात भाजप आणि रिपब्लिकन पार्टी शिवसेना गटापेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसनी प्रचार चा वेग वाढविला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राजेंद्र सोनवणे यांनी आज घरोघरी प्रचार करून उमेदवारांना मीच कसा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार योग्य आहे. या पद्धतीने प्रचार केला. दरम्यान विरोधांकडून पाच कोटी रुपये घेऊन त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवार दिली या वृत्ताचा इन्कार केला. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट हा कधीही पैसे घेऊन उमेदवारी देत नाही उलट तळागाळातील कार्यकर्त्यांना बळ देत उमेदवारी देऊन त्याचा उत्साह वाढवतात असते मत राजेंद्र सोनवणे यांनी व्यक्त केले..
मावळत स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात वातावरण तापू लागले आहेत. मावळातील सर्वच पक्ष एकमेकांवर प्रचाराच्या माध्यमातून आग पाखड करताना दिसत आहे. लोणावळा येथे रिपब्लिकन पार्टी, शिवसेनेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सूर्यकांत वाघमारे यांनी आमदार सुनील शेळके यांचे नाव न घेता त्यांच्यावर जोरदार टीका केली.. पूर्वी लोणावळा शहरांमध्ये एक कार्ड कमिटी होती. लोणावळ्याचे उमेदवार लोणावळ्यात ठरवत असत आता मात्र लोणावळा आघाडी विरुद्ध तळेगाव आघाडी असा सामना होत असून हे परकीय आक्रमक थांबवण्यासाठी व लोणावळ्याची अस्मिता कायम ठेवण्यासाठी मी या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलो आहे. लोणावळ्यातील सर्वच पक्ष सर्व नेते संपून येथील संघटना संपून लोणावळ्याकरांना चिरडत हा बाहेरील रोड रोलर लोणावळाकरांच्या छातीवरून फिरवण्याचा जो प्रयत्न सुरू आहे तो थांबवण्यासाठी व त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही मैदानात उतरलो आहे, असे ते म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.