South Korea Plane Fire  X Social Media
देश विदेश

Plane Fire: १६९ प्रवाशी भरलेल्या विमानाला भीषण आग, थरकाप उडणारी घटना कॅमेऱ्यात कैद

South Korea Flight Fire : दक्षिण कोरियाच्या बुसान येथील विमानतळावर 169 प्रवासी असलेल्या एका प्रवासी विमानाला मंगळवारी आग लागली. दक्षिण कोरियाची वृत्तसंस्था योनहॅपने म्हटले आहे.

Bharat Jadhav

दक्षिण कोरियामधील विमानतळावर एका प्रवासी विमानाला आग लागल्याची घटना घडलीय. टेकऑफ करण्यापूर्वीच आग लागलीय. या विमानात १६९ प्रवाशी होते. दक्षिण कोरियाची एअरलाइन एअर बुसानच्या एअरबस विमानाला आग लागल्याची घटना घडलीय. हे विमान हाँगकाँगच्या दिशेने उड्डाण घेण्याच्या तयारीत होते. ही घटना आग्नेयेकडील गिम्हे आंतरराष्ट्रीय विमानतळावर घडलीय. या घटनेची माहिती परिवहन मंत्रालयाकडून निवेदनात देण्यात आलीय.

विमानातील सर्व १६९ प्रवासी, सहा क्रू सदस्य आणि एक अभियंता यांना एस्केप स्लाइड वापरून बाहेर काढण्यात आल्याची माहितीही मंत्रालयाच्या निवेदनातून देण्यात आलीय. अग्निशामक दल आणि अग्निशमन दल घटनास्थळी तैनात केल्यानंतर सुमारे एक तासानंतर रात्री ११.३१ वाजता आग पूर्णपणे आटोक्यात आल्याचं अग्निशमन दलानं सांगितले. मात्र ही आग कशामुळे लागली याचे कारण अजून समजलं नसल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं.

दरम्यान परिवहन मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार हे विमान A३२१ मॉडेलचे होते. अवघ्या महिन्याभरापूर्वी मुआन आंतरराष्ट्रीय विमानतळावर जेजू एअरचे प्रवासी विमान कोसळले होते. या अपघातात विमानात १८१ जण होते. यात फक्त दोन जणांचा जीव वाचला होता, तर बाकी सर्वांचा मृत्यू झाला होता. ही घटना दक्षिण कोरियाच्या इतिहासातील सर्वात प्राणघातक विमान अपघातांपैकी एक होती.

मागील वर्षातील डिसेंबर महिन्यातील २९ तारखेला झालेल्या अपघातात बोईंग ७३७- ८०० विमान विमानतळाच्या धावपट्टीवरून घसरले. काँक्रीटच्या धावपट्टीवर आदळले त्यानंतर विमानाला आग लागली. हे विमान बँकॉकहून परतत होते. या अपघातात ठार झालेले सर्वजण दक्षिण कोरियाचे नागरिक होते, फक्त दोन प्रवासी थायलंडचे होते. या अपघाताचा प्राथमिक तपास अहवाल सोमवारी प्रसिद्ध करण्यात आला, यात विमानाच्या इंजिनमध्ये पक्ष्यांच्या धडकेच्या खुणा आढळून आल्याचं सांगण्यात आलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

Maharashtra Politics : मुंबईत होणार मराठीची एकजूट; ठाकरेंची युती, महायुतीला धडकी? Video

Ladki Bahin Yojana: महिलांना कधी मिळणार जूनचा हप्ता? आदिती तटकरेंनी थेट तारीखच सांगितली

SCROLL FOR NEXT