South Korea Plane Crash Saam tv
देश विदेश

South Korea Plane Crash : दक्षिण कोरियामध्ये १८१ प्रवाशांना जाणारं विमान क्रॅश; २ प्रवासी बचावले, VIDEO

South Korea Plane Crash update : दक्षिण कोरियामध्ये १८१ प्रवाशांना जाणारं विमान क्रॅश झाल्याची घटना घडली. या अपघातातून फक्त २ प्रवाशांचा जीव वाचू शकला आहे. या अपघाताचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.

Vishal Gangurde

नवी दिल्ली : दक्षिण कोरियामध्ये एक विमानतळावर रविवारी लँडिंगदरम्यान विमान दुर्घटना घडल्याची घटना घडली आहे. यामध्ये घटनेत कमीत कमी १७९ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात फक्त २ प्रवाशांचा जीव वाचला आहे. या भीषण अपघातानंतर संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण कोरियात अपघात झालेल्या विमानात १८१ प्रवासी होते. विमानतळावर लँडिंग करताना विमानाचा अपघात झाला. देशातील भीषण विमान अपघातानंतर सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. अपघाताची घटना घडल्यानंतर राष्ट्रीय अग्निशमन दल मदतीसाठी धावलं. या विमान अपघातात २ जण प्रवासी वाचले.

परिवहन मंत्रालयाने म्हटलं की, 'अपघात झालेलं विमान हे १५ वर्ष जुनं होतं. विमान हे बोइंग ७३७-८०० जेट होतं. आज सकाळी ९ वाजून ३ मिनिटाच्या सुमारास ही अपघाताची घटना घडली आहे. अग्निशमन दलाने सांगितलं की, अपघातानंतर आग लागून झालेल्या दुर्घटनेत १७४ जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेतून २ जणांचा जीव वाचला आहे'.

मीडिया रिपोर्टनुसार, दक्षिण कोरियात झालेल्या अपघातात मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. अपघाताच्या ६ तासानंतरही विमानात काही प्रवासी होते. बचाव पथकाने दोन प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढलं आहे. विमानाच्या पायलट विभागाचे दोन सदस्य होते. आरोग्य अधिकाऱ्यांनी दोघेही शुद्धीत आहेत.

अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी ३२ अग्निबंब आणि अनेक हेलिकॉप्टर तैनात करण्यात आले होते. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान एकूण १५६० होते. पोलीस अधिकारी, सैनिक आणि इतर अधिकारी तैनात होते. या अपघातानंतर विमानतळाच्या पट्टीवर एका भिंतीला धडकून विमानाचा अपघात झाल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये आढळून आलं आहे.

स्थानिक माध्यमांनी प्रसारित केलेल्या व्हिडिओमध्ये विमानातून काळा धूर बाहेर पडत असल्याचे दिसून आलं. मुआन अग्निशमन केंद्राचे प्रमुख ली जियोंग-ह्योन यांनी सांगितलं की, विमान पूर्णपणे नष्ट झालं आहे. विमान दुर्घटनेनंतर ढिगाऱ्याखाली प्रवासी अडकल्याचे आढळले. अपघात नेमका कसा घडला, या कारणाचा शोध घेणे सुरु आहे. विमान आकाशात पक्ष्यांना धडकल्याने अपघात झाला असावा का, असाही शोध सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! ८-९ जुलैला राज्यातील कोणतीही शाळा बंद नाही, शिक्षण विभागाने काढले आदेश

IND vs ENG : भारताचं खातं उघडलं, इंग्लंडचं गर्वहरण, मालिकेत बरोबरी; शुभमन गिलच्या यंग ब्रिगेडनं करुन दाखवलं

Monday Horoscope : बोलण्यापेक्षा कृतींवर लक्ष द्या; 'या' राशींच्या लोकांची भरभराट होणार

मस्क यांचा नवा पक्ष 'अमेरिका पार्टी', उद्योगपती मस्कही उतरणार राजकारणात; ट्रम्प यांच्या वादानंतर मस्क यांचा मोठा निर्णय

Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडचा अभेद्य किल्ला भेदला, ५८ वर्षांनी वनवास संपवला; गिलसेनेने बर्मिंगहॅममध्ये इतिहास रचला

SCROLL FOR NEXT