जोहान्सबर्गमधील क्लीव्हलँड परिसरातील अनधिकृत वस्तीत भीषण गोळीबार झाला.
सशस्त्र टोळीच्या हल्ल्यात १२ जणांचा मृत्यू तर ९ जण जखमी झाले.
रात्री उशिरा झालेल्या या हल्ल्यानंतर परिसरात भीतीचे वातावरण
जोहान्सबर्गमधील एका अनधिकृत वस्तीवर सशस्त्र टोळीने अंदाधुंद गोळीबार केलाय. या गोळीबारात १२ जण ठार आणि ९ जण जखमी झाले आहेत. दक्षिण आफ्रिकेच्या पोलिसांनी हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पथक तयार केली असून त्यांच्या मागावर पाठवली आहेत. अनधिकृत वस्तीत झालेला गोळीबार हा अत्यंत सुनियोजित पद्धतीने करण्यात आल. यात १२ जण ठार आणि नऊ जण गंभीर जखमी झालेत. दक्षिण आफ्रिकेत पोलिसांकडून मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम राबवली जातेय. (Johannesburg informal settlement mass shooting latest update)
दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्गच्या पूर्वेकडील क्लीव्हलँडमधील एका वस्तीत बंदूकधाऱ्यांनी गोळीबार केला. दक्षिण आफ्रिकन पोलीस दलाने सांगितले की, मंगळवारी रात्री उशिरा ११:१० च्या सुमारास 'जंपर्स' या अनधिकृत वस्तीमध्ये गोळीबार झाल्याची माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले. तिथे त्यांना त्या परिसरातील वेगवेगळ्या ठिकाणी व्यक्ती जखमी अवस्थेत आढळून आले.
घटनास्थळीच आठ पुरुष आणि तीन महिलांचा मृत्यू झाला होता, तर आणखी एका व्यक्तीचा रुग्णालयात मृत्यू झाला. जखमींना वैद्यकीय उपचारांसाठी नेण्यात आले आहे, असे वृत्त 'रॉयटर्स'ने दिले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका पांढऱ्या टोयोटा क्वांटम गाडीतून १० हून अधिक संशयितांनी कथितरीत्या त्या वस्तीजवळ सोडण्यात आले. हल्लेखोर दोन प्रवेशद्वारांतून आत शिरले आणि वस्तीत फिरत असताना त्यांनी रहिवाशांवर गोळीबार केला. त्यानंतर ते ज्या कारमधून आले होते त्याच गाडीतून पळून गेले.
हाती माहितीनुसार, एका पांढऱ्या रंगाच्या टोयोटा क्कांटम कारमधून दहा जण क्लीव्हलँडमधील वस्ती जवळील एका पेट्रोल पंपावरती उतरले. परंतु या हल्लेखोरांनी हा गोळीबार का केला याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. तसेच पोलिसांनी आतापर्यंत कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. प्रशासनाने हल्लेखोरांचा शोध सुरू केला असून नागरिकांना माहिती देण्याचे आवाहन केले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.