ओमिक्रॉनचा अमेरिकेतही झाला शिरकाव; तब्बल 24 देशांना घातला विळखा Saam Tv
देश विदेश

ओमिक्रॉनचा अमेरिकेतही झाला शिरकाव; तब्बल 24 देशांना घातला विळखा

कोरोना व्हायरसने जगात चांगलाच धुमाकूळ घातला आहे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वृत्तसंस्था : कोरोना व्हायरसने जगात चांगलाच धुमाकूळ घातला आहे. आता या नव्या व्हेरियंटमुळे ओमिक्रॉनचा धोका वाढतच आहे. तब्बल २४ देशांमध्ये ओमिक्रॉन आता पसरत आहेत. आता ओमिक्रॉनने अमेरिकेत देखील शिरकाव केला आहे. दक्षिण आफ्रिकेतून परतलेल्या एका व्यक्तीमध्ये ओमिक्रॉनची लक्षणे दिसून आली आहेत.

हे देखील पहा-

अमेरिकेमध्ये आढळलेला ओमिक्रॉन व्हेरियंटचा हा पहिलाच रुग्ण आहे. ओमिक्रॉनचा पहिला रुग्ण सापडल्यावर व्हाईट हाऊसने अमेरिकन नागरिकांना कोरोना लस आणि बूस्टर डोस घेण्याची विनंती केली आहे.

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे मुख्य आरोग्य सल्लागार डॉ. एंथनी फौची यांनी दिलेल्या माहितीनुसार की, दक्षिण आफ्रिकेतून कॅलिफोर्नियामध्ये परतलेल्या व्यक्तीमध्ये कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचे संक्रमण आढळून आले आहेत.

या व्यक्तींचे संपूर्ण लसीकरण झालेले होते.तरीही देखील त्याला सौम्य स्वरुपाची लक्षणे दिसून येत होती. मात्र, आता त्यामध्ये हळूहळू सुधारणा होत आहे. कॅनडा, बेल्जियम, ब्राझील, फ्रान्स, झेक रिपब्लिकन, स्पेन, इटली, नॉर्वे, जर्मनी, स्वीडन, इस्त्राईल, सौदी अरेबिया, जपान, दक्षिण कोरिया, हाँगकाँग, ऑस्ट्रेलिया, ऑस्ट्रिया, डेन्मार्क या देशांमध्ये ओमिक्रॉनने संक्रमित रुग्ण आढळत आहेत. या पार्श्वभूमीवर आता सर्व देशांनी काळजी घ्यायला सुरुवात देखील केली आहे. जपानने आता लोकांना बूस्टर डोस देण्यास सुरुवात करण्यात येत आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vaibhav-Irina : देखो ना खुद को जरा... इरिना-वैभवचा जिममध्ये रोमँटिक डान्स; चाहते म्हणाले, 'फॉरेनची पाटलीण'

New Family Pension Rule: आई- बाबांची पेन्शन मुलांना मिळते का? लग्न झालेल्या मुलीचा अधिकार किती?

Maharashtra News Live Updates :शरद पवार यांच्यासह प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील महाराष्ट्र पिंजून काढणार

Maharashtra Politics: माझी भीती का? एवढी व्यूहरचना कशासाठी? धनंजय मुंडेचा थेट शरद पवारांना इशारा

Haircare Tips: कमी वयात केस पांढरे झालेत? करा 'या' टिप्स फॉलो

SCROLL FOR NEXT