Sonia Gandhi-Smriti Irani Latest Update SAAM TV
देश विदेश

Sonia Gandhi-Smriti Irani: सोनिया गांधी-स्मृती इराणी यांच्यात शाब्दिक चकमक; खासदारांना हस्तक्षेप करावा लागला

अधीर रंजन चौधरी यांनी राष्ट्रपतींचा उल्लेख करताना आक्षेपार्ह शब्द वापरला. यावरून भाजप आक्रमक झाला.

Nandkumar Joshi

नवी दिल्ली: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्यावरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी वादात सापडले. यावरून संसदेत जोरदार गदारोळ झाला. भाजपने संसदेच्या सभागृहात काँग्रेसला घेरण्याचा प्रयत्न केला.

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी माफी मागावी, अशी मागणी इराणी यांनी केली. त्याचदरम्यान संसदेतील वातावरण तापलं. दुसरीकडे, सोनिया गांधी आणि स्मृती इराणी सभागृहात आमनेसामने आल्या. सूत्रांच्या माहितीनुसार, यावेळी संसदेच्या सभागृहातील अनेक सदस्यांना यामध्ये हस्तक्षेप करावा लागला. (Sonia Gandhi- Smriti Irani News Update)

लोकसभेच्या सभागृहात (Loksabha) साधारण १२ वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला. सभागृहाचं कामकाज स्थगित झाल्यानंतर भाजपचे खासदार हे सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या घोषणा करत होत्या. सोनिया गांधी त्याचवेळी सभागृहातून बाहेर जात होत्या. मात्र, घोषणाबाजी सुरू असल्याने सोनिया परत आल्या आणि रमा देवी यांच्याजवळ गेल्या.

अधीर रंजन चौधरींनी (Adhir Ranjan Chowdhury) माफी मागितली आहे, असे त्या म्हणाल्या. त्याचवेळी स्मृती इराणी (Smriti Irani) त्यांना उद्देशून काही तरी बोलल्या. त्यावेळी सोनियांनी प्रत्युत्तर दिले. 'डोन्ट टॉक टू मी' असं त्या स्मृती इराणींना म्हणाल्या. त्यानंतर स्मृती इराणी आणि सोनिया गांधी यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. जवळपास दोन-तीन मिनिटे त्यांच्यात शाब्दिक चकमक सुरू होती.

सोनिया गांधी या रमा देवींशी बोलत होत्या, त्यावेळी बिट्टू आणि गौरव गोगोई त्या ठिकाणी उपस्थित होते. सूत्रांच्या माहितीनुसार, यामध्ये माझे नाव का घेतले जात आहे, असा प्रश्न सोनियांनी रमा देवी यांना विचारला. त्यावेळी स्मृती इराणी तिथे आल्या. मी तुम्हाला काही मदत करू शकते का, असं त्यांनी सोनिया यांना विचारलं. मी तुमचं नाव घेतलं होतं, असं स्मृती म्हणाल्या. त्यावर सोनिया गांधी संतापल्या आणि डोन्ट टॉक टू मी असं त्या स्मृतींना म्हणाल्या. त्यांच्यात शाब्दिक चकमक सुरू असताना दोन्ही पक्षांचे खासदार त्याठिकाणी आले. त्यांनी हस्तक्षेप करून वाद मिटवला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lalbaugcha Raja 2025: गुलाल अन् फुलांची उधळण; लालबागच्या राजाच्या निरोपाचा भावनिक क्षण

Red Chilli Benefits : लाल मिरचीचे गुप्त आरोग्यदायी गुण; जाणून घ्या निरोगी आरोग्याचं गुपित

Maharashtra Live News Update: नोएडा, उत्तर प्रदेशातील अनेक भागांत पावसाने लावली हजेरी

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागचा राजा मंडपातून बाहेर; फुलांचा वर्षाव करत मानवंदना; VIDEO

IPS Anjana Krushna: IPS अंजना कृष्णा याचं काय चुकलं? ठाकरेंच्या नेत्याचा अजित पवारांना सवाल

SCROLL FOR NEXT