Pune News : सोनिया गांधींची ईडीकडून चौकशी; पुण्यात युवक काँग्रेसने रेल्वे अडवली

खडकी रेल्वे स्टेशनवर युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रेल रोको आंदोलन केलं.
Pune Congress
Pune Congress Saam Tv
Published On

ज्ञानेश्वर हिंगोलीकर

पुणे : काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांची सध्या नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी चौकशी सुरू आहे. आज ईडीने (ED) सलग दुसऱ्यांना त्यांना चौकशीसाठी बोलावलं होतं. दरम्यान, सोनिया गांधींच्या ईडी चौकशीविरोधात कॉंग्रेसने देशभरात आंदोलनं केली. पुण्यातही कॉंग्रेस कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. खडकी रेल्वे स्टेशनवर युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रेल रोको आंदोलन केलं. (Sonia Gandhi News In Marathi)

Pune Congress
National Herald Case : सोनिया गांधींची चौकशी संपली, तब्बल तीन तासानंतर ईडी कार्यालयातून बाहेर

यावेळी कार्यकर्त्यांनी सोनिया गांधी यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान पुण्यासह मुंबई, दिल्लीतही संसद भवन परिसरात काँग्रेसच्या खासदारांचे आंदोलन सुरू आहे. सोनिया गांधी यांच्या मागे ईडीची चौकशी लागल्यानंतर काँग्रेस आक्रमक झाली आहे.

देशभरात काँग्रेसकडून आंदोलने सुरु आहेत. या पार्शवभूमीवर पुणे शहरात आज युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. यावेळी त्यांनी खडकी रेल्वे स्टेशनवर रेल रोको आंदोलन केलं. यावेळी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत सुड बुद्धीनं ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला. (Pune Congress Latest News)

Pune Congress
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर ज्योतिषींनी केली मोठी भविष्यवाणी; म्हणाले...

नागपुरातही आंदोलन

नागपुरमध्येही काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून ईडी कार्यालयाच्या समोर निषेध आंदोलन केलं. काल नागपुरात काँग्रेसच्या आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एक कार पेटवून दिली होती. त्यानंतर आज नागपूर पोलिसांनी इडी कार्यालयासमोर चोख सुरक्षा व्यवस्था लावली आहे. बॅरीकेटिंग करुन ईडी कार्यालय असलेल्या सिजीओ कॉम्प्लेक्स परिसरचे मुख्य दार बंद करण्यात आलं आहे.

दरम्यान, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी बुधवारी तिसऱ्यांदा अंमलबजावणी संचालनालयासमोर हजर झाल्या. नॅशनल हेराल्ड प्रकरणात सोनिया गांधी ईडीसमोर हजर होण्याची ही तिसरी वेळ आहे. सोनिया गांधी यांची आज ईडीने तीन तास चौकशी केली. त्यानंतर ईडीने त्यांना पुन्हा नव्याने समन्स जारी केले नाही. सोनिया गांधी यांची गेल्या तीन दिवसांत ११ तास ईडीने चौकशी केली आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com