PM Modi Saam Tv
देश विदेश

PM Modi On Triple Talak : काही राजकीय पक्ष स्वार्थासाठी मुस्लिमांना भडकवतात; PM मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल

PM Narendra Modi Speech: पीएम मोदींनी सांगतले की, 'एक घर दोन कायद्यांनी चालत नाही. त्याचप्रमाणे एका देशात दोन कायदे असू शकत नाहीत.'

Priya More

PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी मंगळवारी भोपाळमध्ये 'मेरा बूथ सबसे मजबूत' या कार्यक्रमांतर्गत कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी तिहेरी तलाक, युनिफॉर्म सिव्हिल कोड अर्थात यूसीसी आणि देशातील समान नागरी संहितेबाबत पंतप्रधान मोदींनी मोठे विधान केले. पीएम मोदींनी सांगतले की, 'एक घर दोन कायद्यांनी चालत नाही. त्याचप्रमाणे एका देशात दोन कायदे असू शकत नाहीत.'

पीएम मोदी यांनी सांगितले की, 'जगातील बहुतेक मुस्लिम देशांमध्ये तिहेरी तलाक रद्द करण्यात आले आहे. पण आपल्या देशात काही राजकीय पक्ष स्वतःच्या फायद्यासाठी मुस्लिम बांधवांना भडकवत आहेत. समान नागरी संहितेच्या नावाखाली मुस्लिम बांधवांना भडकवले जात आहे.' तसंच, 'एकाच कुटुंबात दोन प्रकारचे नियम असतील का? देशाच्या संविधानात सर्वांना समान कायदा असे म्हटले आहे. सुप्रीम कोर्टाने वारंवार ताशेरे ओढले तरी हे लोकं व्होटबँकेचे भुकेले आहेत.', अशी टीका त्यांनी केली.

तिहेरी तलाकबाबत पीएम मोदींनी सांगितले की, 'जी लोकं तिहेरी तलाकच्या बाजूने बोलतात ती लोकं मुस्लीम मुलींवर मोठा अन्याय करत आहेत. तिहेरी तलाकमुळे केवळ मुलींचेच नुकसान होत नाही. तर ते संपूर्ण कुटुंबाला उद्ध्वस्त करते. मला वाटते की काही लोकं मुस्लिम मुलींच्या गळ्यात तिहेरी तलाकचा फास अडकवून त्यांच्यावर अन्याय करत आहेत.' तसंच,'जर तिहेरी तलाक इस्लामचा अत्यावश्यक भाग होता. तर इतर देशांनी तो रद्द का केला?',असा सवाल मोदींनी यावेळी केला आहे.

'एसीमध्ये बसून पक्ष चालवणाऱ्यांमध्ये आम्ही नाही. आम्ही ती लोकं आहोत जी गावोगावी जाऊन लोकांच्या समस्या समजून घेतो आणि त्यांच्या पाठीशी उभे राहतो. 2014 आणि 2019 मध्ये भाजपच्या कट्टर विरोधकांनी तेव्हा जेवढी हतबलता दाखवली नव्हीत तेवढी आज दाखवली आहे. पूर्वी ज्यांना पाणी पिऊन शिव्या द्यायचे ती लोकं आज त्यांच्यासमोर नतमस्तक होत आहेत.', अशी टीका मोदींनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mangal Gochar 2025: सप्टेंबर महिन्यात पालटणार 'या' राशींचं नशीब; मंगळाच्या गोचरने होणार लाभ

Maharashtra Live News Update: संगमेश्वर माखजन बाजारपेठेला पुन्हा एकदा पुराचा धोका

Ganeshotsav 2025: यंदा गणेशोत्सव कधी आहे? जाणून घ्या तारीख

Khopoli Ghat Traffic : खोपोली घाटात १०० हून अधिक कार थांबल्या, जाणून घ्या धक्कादायक कारण

Mobile Deals: ३००० पेक्षा कमी किंमतीत मोबाईल फोन, YouTube आणि JioHostar पाहण्याची देखील सुविधा

SCROLL FOR NEXT