Maharashtra Landslides Alert: पुढील ४८ तास धोक्याचे, मुंबई, पुण्यासह या जिल्ह्यांमध्ये दरड कोसळण्याची भीती

Landslides Alert: मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सातारा, पुणे याठिकाणी दरळ कोसण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
Maharashtra Landslides Alert
Maharashtra Landslides AlertSaam TV
Published On

Maharashtra Landslides Alert: यंदा उशीरा का होईना, मान्सून राज्यात दाखल झाला आहे. दोन दिवसांतच मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापून टाकला आहे. त्यामुळे अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. मुंबई कोकणासह, घाटमाथ्यावर पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. पावसामुळे अनेक ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना देखील घडत आहे. अशातच राज्यासाठी पुढील ४८ तास अतिमहत्वाचे आहे.

Maharashtra Landslides Alert
Gold Silver Price: सोन्याचा भाव दणकून आपटला, चांदीत किंचित वाढ; जाणून घ्या आजचे दर

कारण, येत्या ४८ तासांत राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस (Rain Alert) पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्याचबरोबर मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सातारा, पुणे याठिकाणी दरळ कोसण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

'सतर्क'ने याबाबत अपडेट दिले आहे.त्यामुळे घाट माथ्यावरील (Landslides Alert) रस्त्यांवरून प्रवास करताना वाहनधारकांना काळजी घेणे गरजेचे आहे. तसेच जीर्ण वाडे, घरे, टेकड्यांच्या उतारावर/ पायथ्याशी असणाऱ्या कुटुंबांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

राज्यासाठी पुढील ४८ तास धोक्याचे

मान्सूनचे (Monsson 2023) आगमन झाल्यानंतर पुढील दोन दिवस राज्यात सर्वदूर पावसाचा अंदाज आहे. नाशिक, मुंबईसह पालघर, ठाणे जिल्ह्यांनाही मंगळवारी, तर पालघर आणि रायगड जिल्ह्याला बुधवारी “ऑरेंज अ‍ॅलर्ट” देण्यात आला आहे. पुण्यासह अन्य काही जिल्ह्यांतील तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

त्याबरोबर नाशिक, पुणे आणि सातारासह विदर्भात अमरावती, नागपूर येथे काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर भंडारा आणि गोंदिया येथे काही ठिकाणी अतितीव्र मुसळधार पाऊसही होऊ शकेल. या काळात विदर्भामध्ये मेघगर्जनेचीही शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com