Maharashtra Weather Update : पुढील 3 दिवस राज्यातील अनेक भागात मुसळधार; IMDचा या जिल्ह्यांना ऑरेंज आणि यलो अलर्ट

Maharashtra Rains News : मागील दोन दिवसात मुंबई, नवी मुंबई, ठाणे परिसरात मुसळधार पाऊस पडला आहे.
Maharashtra Rains
Maharashtra Rains Saam TV
Published On

Monsoon 2023 News : उशीरा आलेला मान्सून आता राज्यात सर्वदूर पसरत आहे. राज्यातील अनेक भागात पावसाने दमदार हजेरी लावल्याने  शेतकरी सुखवला आहे. मागील दोन दिवसात मुंबई, नवी मुंबई, ठाणे परिसरात मुसळधार पाऊस पडत आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार, येत्या 4-5 दिवसांत मान्सून महाराष्ट्रात सक्रिय राहण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसांत मुसळधार पावसासाठी (Rain) ऑरेंज आणि यलो अलर्ट देण्यात आला आहे.

पुढील तीन दिवस कसा असेल पाऊस?

28 जून - हवामान विभागाने पुढील चार दिवस राज्यात पाऊस कसा असेल याचा अंदाज दिला आहे. उद्या म्हणजे 28 जून रोजी मुंबईमध्ये यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर कोकणात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भात आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात यलो अलर्ट देण्यात आला आहे. (Maharashtra News)

Maharashtra Rains
Vegetable Price Hike: गृहिणींचं बजेट कोलमडलं! भाजीपाल्याच्या किंमती 25 टक्क्यांनी वाढल्या, जाणून घ्या आजचे दर

29 जून रोजी रायगडमध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर मुंबईसह ठाणे, पुणे, पालघर, विदर्भातही यलो अलर्ट देण्यात आला आहे. रत्नागिरी, सातारा, नाशिक जिल्ह्यातही यलो अलर्ट देण्यात आला आहे.

30 जून रोजी रायगड जिल्हात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर पुणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्गात यलो अलर्ट देण्यात आला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com