Vegetable Price Hike: गृहिणींचं बजेट कोलमडलं! भाजीपाल्याच्या किंमती 25 टक्क्यांनी वाढल्या, जाणून घ्या आजचे दर

APMC Market Vegetable Price: भाजीपाल्याची आवक वाढल्यानंतर भाज्यांचे दर पुन्हा कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Vegetables Price Hike
Vegetables Price HikeSaam Tv
Published On

सिद्धेश म्हात्रे, नवी मुंबई

Navi Mumbai News: कडाक्याचे ऊन आणि मान्सूनचे (Monsoon 2023) उशिरा झालेल्या आगमनाचा परिणाम आता भाजीपाल्यांच्या उत्पादनावर झाल्याचे दिसून येत आहे. भाजीपाल्याचे दर (Vegitable Price) वाढल्यामुळे आता गृहिणींचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये (Navi Mumbai APMC Market) भाज्यांच्या किमती २५ टक्क्यांनी वाढल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशावर ताण आला आहे.

Vegetables Price Hike
Goa-Mumbai Vande Bharat Express: पीएम मोदींच्या हस्ते वंदे भारत एक्स्प्रेचे लोकार्पण, अवघ्या 10 तासांमध्ये पोहचणार गोव्यात

मिळालेल्या माहितीनुसार, नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाल्यांचे दर 25 टक्क्यांनी वाढले आहेत. यावर्षी लांबलेला उन्हाळा आणि पाण्याची कमतरता यामुळे भाजीपाल्याचे उत्पादन घटले आहे. आवक कमी आणि मागणी वाढल्याने भाजीपाल्याचे दर वाढले आहेत.

एपीएमसी मार्केटमध्ये प्रामुख्याने टोमॅटो, फरसबी, वाटाणा, मिरची आणि कोथिंबीरचे दर मोठ्या प्रमाणात वाढल्याचे चित्र पहायला मिळत आहे. भाजीपाल्याचे दर नियंत्रणात येण्यासाठी आणखी महिनाभराचा कालावधी लागण्याची शक्यता भाजीपाला मार्केटचे संचालक शंकर पिंगळे यांनी व्यक्त केली आहे. तसंच, भाजीपाल्याची आवक वाढल्यानंतर भाज्यांचे दर पुन्हा कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Vegetables Price Hike
Supriya Sule News: पुणे विद्येचे माहेरघर, त्याला गुन्हेगारांचे नंदनवन बनवू नका; सुप्रिया सुळे संतापल्या

एपीएमसी मार्केटमधील भाजीपाल्यांचे दर प्रतिकिलोप्रमाणे -

कारली - 37 रुपये किलो

सिमला - 30 रुपये किलो

काकडी- 22 रुपये किलो

वांगी- 28 रुपये किलो

दुधी - 17 रुपये किलो

फरसबी - 55 रुपये किलो

वालवड- 26 रुपये किलो

शिराळी - 25 रुपये किलो

शेवगा - 43 रुपये किलो

गवार - 40 रुपये किलो

गाजर - 28 रुपये किलो

कोबी- 9 रुपये किलो

फ्लॉवर- 10 रुपये किलो

वाटाणा - 60 रुपये किलो

तोंडली - 25 रुपये किलो

भेंडी- 24 रुपये किलो

मिरची - 48 रुपये किलो

टोमॅटो - 36 रुपये किलो

भाज्या प्रती जुडी -

पालक - 12 रुपये

कोथंबीर - 22 रुपये

शेपू - 20 रुपये

मेथी - 18 रुपये

कांदापात - 14 रुपये

Vegetables Price Hike
Ashadhi Ekadashi 2023: वारकऱ्यांसाठी खुशखबर! पंढरपूरला जाण्यासाठी अकोल्यातून मोफत बससेवा; ठाकरे गटाच्या आमदाराची घोषणा

दरम्यान, नागपूरमध्ये देखील भाज्यांचे दर वाढले आहे. याठिकाणी पावसामुळे भाज्यांचे दर चांगलेच वधारले आहेत. सर्वच भाज्यांचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. याठिकाणी फरसबी, कोथिंबीर 330 रुपये किलोवर गेली आहे. चिकन पेक्षाही हे दर अधिक आहे. इतर सर्व भाज्या शंभर रुपये किलोंवर गेले आहे. नवीन भाज्या निघेपर्यंत हे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर ताण पडत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com