Ashadhi Ekadashi 2023: 'अवघे गर्जे पंढरपूर, चालला नामाचा गजर' आषाढी एकादशी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असून अवघ्या महाराष्ट्रातील वातावरण विठूमय झालं आहे. अनेक जिल्ह्यांमधून वारकरी पंढरपूरकडे रवाना होत आहे. अशातच आषाढी यात्रेसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. पंढरपूरकडे जाण्यासाठी मोफत एसटी बस प्रवासाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
आषाढी एकादशीच्या निमित्ताने अकोल्यामधून (Akola News) विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांची मोठी संख्या आहे. त्यासाठी अकोला मधून थेट पंढरपूरला जाण्यासाठी मोफत एसटी बसेस ची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
बाळापूर मतदारसंघाचे आमदार नितीन देशमुख यांनी पंढरपूरला (Pandharpur) जाणाऱ्या बसेसचा शुभारंभ करत वारकऱ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी एसटी बसेसचे चालक आणि वाहकांचा सत्कार करत सुरक्षित प्रवासाला आमदारांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
पंढरपूरला जाणाऱ्या बसेसचा शुभारंभ झाल्यानंतर आमदार नितीन देशमुख यांनी साम टीव्हीसोबत संवाद साधला. नितीन देशमुख म्हणाले, दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा वारकरी विठुरायांना (Ashadhi Ekadashi 2023) साकडे घालण्यासाठी पंढरपूरला निघाले आहेत.
शेतकऱ्यांच, बळीराजाच राज्य यावं, शेतकऱ्यांच्या हिताच राज्य यावं आणि पुढच्या वर्षी उद्धव ठाकरे साहेबांच्या हस्ते विठूरायांची आरती व्हावी, हे साकडं घालण्यासाठी अनेक वारकरी, विठूरायाकडे साकडे घालण्यासाठी जात आहेत, असंही आमदार नितीन देशमुख यांनी सांगितलं.
Edited by - Satish Daud
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.