Vande Bharat Express Launched
Vande Bharat Express LaunchedANI

Goa-Mumbai Vande Bharat Express: पीएम मोदींच्या हस्ते वंदे भारत एक्स्प्रेचे लोकार्पण, अवघ्या 10 तासांमध्ये पोहचणार गोव्यात

PM Modi Flags Off Vande Bharat Express: गोवा - मुंबई मार्गावरील वंदे भारत एक्स्प्रेस मडगाववरुन मुंबईच्या दिशेने रवाना झाली.
Published on

Mumbai - Goa Vande Bharat Express Launched: मुंबई ते गोवा प्रवास करणाऱ्यांसाठी तसेच कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेसला (Goa-Mumbai Vande Bharat Express) अखेर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी हिरवा झेंडा दाखवला. त्यानंतर गोवा - मुंबई मार्गावरील वंदे भारत एक्स्प्रेस मडगाववरुन मुंबईच्या दिशेने रवाना झाली. या रेल्वेचे सारथ्य ए.के.कश्यप यांनी केले आहे.

Vande Bharat Express Launched
Attacked On Young Girl By Koyta : पुणे हादरले! दर्शना पवार हत्या प्रकरणाची पुनरावृत्ती टळली, पोलीस ठाण्यासमोरच विद्यार्थिनीवर कोयत्याने हल्ला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज 5 वंदे भारत एक्स्प्रेसचे लोकार्पण झाले. भोपाळ येथे पीएम मोदींनी या वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवला. गोवा (मडगाव) ते मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस, भोपाळ (राणी कमलापती) ते इंदोर वंदे भारत एक्स्प्रेस, भोपाळ (राणी कमलापती) ते जबलपूर वंदे भारत एक्स्प्रेस, रांची ते पटना वंदे भारत एक्स्प्रेस आणि धारवाड ते बंगळुरू वंदे भारत एक्स्प्रेस यांना मोदींनी हिरवा झेंडा दाखवला असून त्या आजपासून सुरु झाल्या आहेत.

Vande Bharat Express Launched
ICC ODI WC 2023 Schedule: लागा तयारीला! ICC वनडे वर्ल्ड कप स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर; या दिवशी रंगणार भारत- पाकिस्तान सामना

गोवा- मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस ही गोव्यासाठीची पहिली वंदे भारत एक्स्प्रेस असणार आहे. गोव्याला जाणाऱ्या पर्यटक आणि कोकणवासीयांसाठी ही वंदे भारत एक्स्प्रेस खूपच फायदेशीर ठरणार आहे. या ट्रेनमुळे अवघ्या 10 तासांमध्ये प्रवासी मुंबईवरुन गोव्यात पोहचू शकणार आहेत. ही ट्रेन आठवड्यातून तीन दिवसच धावणार आहे.

वंदे भारत एक्स्प्रेस ही ट्रेन मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते गोव्याच्या मडगाव रेल्वे स्थानकादरम्यान धावणार आहे. या ट्रेनमुळे गोवा आणि महाराष्ट्र या राज्यातील पर्यटनाला चालना मिळणार आहे. मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेस ही महाराष्ट्रातून धावणारी चौथी वंदे भारत ट्रेन आहे. याआधी मुंबई- शिर्डी, मुंबई- सोलापूर आणि मुंबई- गांधीनगर या तीन वंदे भारत एक्स्प्रेस महाराष्ट्रातून धावतात. या ट्रेनमध्ये 70 टक्के लोक प्रवास करतात.

Vande Bharat Express Launched
Nashik Accident News: दुचाकी - बसचा भीषण अपघात! ३ शिवसैनिकांचा जागीच मृत्यू

गोवा ते मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसचे वेळापत्रक -

- वंदे भारत एक्स्प्रेस ही सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी मुंबईवरून गोव्याच्या दिशेने धावेल.

- मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी ही ट्रेन गोव्यावरुन मुंबईच्या दिशेने धावेल.

- ही ट्रेन मुंबईतल्या सीएसएमटी रेल्वे स्टेशनवरुन सकाळी 5.32 वाजता सुटेल. गोव्यातील मडगाव रेल्वे स्टेशनवर दुपारी 3.30 वाजता पोहोचेल.

- ही ट्रेन मडगावरुन दुपारी 12.20 वाजता सुटेल. तर मुंबईला रात्री 10.25 वाजता पोहोचेल.

- तर मान्सून गेल्यानंतर या ट्रेनचा वेग वाढवला जाणार आहे आणि 586 किमी अंतर केवळ 7 तास 50 मिनिटांत कापेल. यादरम्यान ट्रेनला अकरा थांबे असतील.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com