Nashik Accident News: दुचाकी - बसचा भीषण अपघात! ३ शिवसैनिकांचा जागीच मृत्यू

Nashik News Update: जोपर्यंत या ठिकाणी गतिरोधक बसवत नाही तोपर्यंत अंत्यविधी करणार नाही असा पवित्र संतप्त नागरिकांनी घेतला.
Nashik Accident News
Nashik Accident NewsSaamtv
Published On

अजय सोनवणे, प्रतिनिधी...

Niphad Accident News: नाशिकमधून एक काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. निफाड तालुक्यातील शिरवाड फाट्यावर काल रात्रीच्या सुमारास अज्ञात बसच्या धडकेत तिघा मित्रांचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. अपघातात मृत्यू झालेले तिघेही युवा सेनेचे कार्यकर्ते आहेत. त्यांच्या अपघातामुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली असून आज गाव बंद ठेवण्यात आले आहे.

Nashik Accident News
Bhiwandi NCP News: राष्ट्रवादी कॉंग्रेसला सर्वात मोठा धक्का! भिवंडीतील १८ नगरसेवक अपात्र

याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, मुंबई-आग्रा महामार्गावर (Mumbai -Agra Highway) मोटरसायकल आणि बसच्या भीषण अपघातात (Accident) तीन शिवसैनिकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सोमवार 26 जून रोजी रात्री 11 वाजेच्या दरम्यान निफाड तालुक्यातील शिरवाडे वणी जवळ हा दुर्देवी अपघात झाला. यामध्ये युवासेना निफाड तालुका उपप्रमुख सुभाष माणिकराव निफाडे, शिवसैनिक महेश चंद्रकांत निफाडे, नितीन भास्करराव निफाडे तिघांचे निधन झाले.

या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी अपघाताच्या निषेधार्थ रास्ता रोको केला. ज्यामुळे मुंबई-आग्रा महामार्ग रोखून धरल्याने वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या. जोपर्यंत गतिरोधक या ठिकाणी बसवत नाही तोपर्यंत अंत्यविधी करणार नाही असा पवित्र संतप्त नागरिकांनी घेतला. (Latest Marathi News)

Nashik Accident News
Nashik Crime News : विधाते गल्लीत गळा चिरुन विवाहितेची हत्या, पतीसह 10 ते 12 जण पाेलिसांच्या ताब्यात

दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार घटनास्थळी दाखल झाल्या. यावेळी त्यांनी रस्ता रोको मागे घेण्यासाठी ग्रामस्थांना मध्यस्थी केली. या दुर्देवी घटनेनेशिरवाडे गावावर शोककळा पसरली आहे. घरातील कर्ते पुरुष गेल्याने कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तिघांवर एकाच वेळी शिरवाडे येथे शोकाकुल वातावरणात सकाळी दहा वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. (Nashik News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com