Vvinod Tawde Saam Tv
देश विदेश

Vinod Tawde: विनोद तावडे राज्यात कमबॅक करणार की, राष्ट्रीय अध्यक्षपदी विराजमान होणार?

BJP New National President: विनोद तावडेंना पक्षात मोठी संधी दिली जाऊ शकते, असं सूचक विधान चंद्रकांत पाटील यांनी केलंय. विनोद तावडेंनी पक्षाच्या सरचिटणीस पदाची जबाबदारी यशस्वीपणे पूर्ण केली आहे. तसंच पक्ष चालवण्यासाठी विनोद तावडेंची भूमिका मोठी असल्याचंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय.

Tanmay Tillu

राज्यात लोकसभा निवडणुकीत भाजपच्या सुमार कामगिरीनंतर आता केंद्रिय पातळीवर राज्यात भाकरी फिरवण्याचा गंभीरपणे विचार केला जात असल्याचे संकेत मिळतायत.यात विनोद तावडेंचं नाव आघाडीवर आहे. याबाबत भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री सुधीर मुनगंटीवारांनी सूचक वक्तव्य केल्यानं या चर्चांना अधिक बळ मिळतंय.

पंतप्रधान नरेंद्र मोदींची उमेदवारी असलेली पहिली यादी जाहीर करण्यापासून भाजपच्या राष्ट्रीय स्तरावरील सगळ्या महत्त्वाच्या बैठकांपर्यंत सर्वांमध्ये एक ‘मराठी’ नाव कायम आघाडीवर होतं, ते म्हणजे विनोद तावडे यांचं. अगदी नितीश कुमारांना पुन्हा एनडीएत आणण्यामागे ज्या हालचाली झाल्या त्यातही तावडेंचं कौशल्य होतं. 2019 च्या विधानसभा निवडणुकीवेळी तावडेंना उमेदवारी नाकारण्यात आली.

तावडे राज्याच्या राजकारणातून बाहेर फेकले गेले होते. मात्र तावडेंनी नव्या जबाबदारीसह जबरदस्त कमबॅक केलं.संघटनात्मक कौशल्याच्या जोरावर ते सरचिटणीसपदापर्यंत पोहचले. महाराष्ट्रातून प्रमोद महाजनांनंतर भाजपत या पदावर पोहचलेले ते पहिले नेते. आता नड्डा केंद्रीय मंत्रिपदावर गेल्यामुळे भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावर त्यांची वर्णी लागणार अशी जोरदार चर्चा सुरू झालीय. तसे संकेतही राज्यातले जबाबदार नेते देत आहेत.

तावडेंसह भाजपच्या अध्यक्षपदासाठी अमित शाहांचे अत्यंत निकटवर्तीय समजले जाणारे आणि ओडिशाचे प्रभारी सुनील बन्सल यांचंही नाव आघाडीवर आहे. तसंच भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मोदींचे निकटवर्तीय ओ पी माथूर यांचंही नाव चर्चेत आहे. माजी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांना मंत्रिमंडळातून वगळ्यामुळे त्यांच्या नावाचीही चर्चा आहे. तसंच भाजपच्या ओबीसी मोर्चाचे अध्य़क्ष के. लक्ष्मण यांचं नावही आघाडीवर असल्याचं बोललं जातंय.

लोकसभा निवडणुकीतला दारूण पराभव आणि फडणवीस यांनीही ‘सरकरमधून मोकळे करण्याची मागणी केल्यामुळे राज्यातही बदल होण्याची शक्यता आहे. 2019ला तिकीट कापलेले विनोद तावडेंनी राज्यात पुन्हा कुठेही अंतर्गत गटबाजी किंवा हालचाली न करता दिल्लीत पक्षश्रेष्ठींचा विश्वास कमवला..ओन्ली राष्ट्र, नो महाराष्ट्र असं म्हणणा-यांवर तावडेंना पक्षाची सर्वोच्च जबाबदारी मिळणार की राज्यातली मोठी जबाबदारी याकडे लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha vijay live updates : विजयी मेळावा, राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकाच मंचावर, लाईव्ह अपडेट एका क्लिकवर

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना कर्ज नाही; अजित पवारांचं आश्वासन हवेत विरलं, कारण काय?

Maharashtra Live News Update: आज राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र; तब्बल १९ वर्षानंतर एकत्र

Saturday Horoscope : मोठी स्वप्न पूर्ण होतील, दिवस चांगला जाणार; ५ राशींच्या लोकांचं नशीब उजळणार

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

SCROLL FOR NEXT