Sri Lanka Curfew Saam Tv
देश विदेश

श्रीलंकेत कर्फ्यूनंतर आता सोशल मीडियावर बंदी; कर्फ्यू लागू

श्रीलंकेतील परिस्थिती बिकट होत चालली आहे. कर्फ्यू लागू केल्यानंतर आता तेथील सरकारने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घातली आहे.

वृत्तसंस्था

वृत्तसंस्था: आजपासून, श्रीलंकेत फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअॅप आणि इन्स्टाग्राम यासह सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सेवा बंद करण्यात आली आहेत. शनिवारी रात्री उशिरापासून कोलंबोसह अनेक शहरांमध्ये (City) सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने काम करणे बंद केले. आज देशभर सुरू असलेली निदर्शने रोखण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे.

हे देखील पहा-

इंटरनेट बाबतच्या घडामोडींवर लक्ष ठेवणाऱ्या नेटब्लॉक्सने ट्विट करत माहिती दिली आहे की, रिअल-टाइम नेटवर्क डेटा दर्शवितो की श्रीलंकेने देशभरात सोशल मीडिया ब्लॅकआउट लागू केला आहे. देशभरात सरकारविरोधात सुरु असलेल्या निषेधाच्या पार्श्वभूमीवर आणीबाणी लागू केल्यामुळे ट्विटर, फेसबुक, व्हॉट्सअॅप, यूट्यूब आणि इंस्टाग्रामसह अनेक प्लॅटफॉर्म्सवर बंदी लागू करण्यात आली आहे.

काल रविवारीच सरकारने 36 तासांचा कर्फ्यू लागू केला आहे. देशभरात सगळीकडेच वीजेची टंचाई निर्माण झाली असून महागाई गगनाला भिडली आहे. देशात सर्वच जीवनावश्यक वस्तूंचे भाव जवळपास तीन पटीने वाढले असून सगळीकडेच रांगा लागल्या आहेत.

जवळपास 22 दशलक्ष लोकसंख्या असलेलं आणि बेटावर वसलेल्या श्रीलंकेवर अशी परिस्थिती पहिल्यांदा आली आहे. मात्र, वाढत्या जनक्षोभाचा सामना करणं सरकारला अवघड जात असून इंधन आयात करण्यासाठीही परकीय चलन उपलब्ध नसल्याने परिस्थिती बिकट होत चालली आहे. देशातील ही अराजकता शांत करणं सरकारसमोरील आव्हान बनत चाललं आहे.

गेल्या शुक्रवारी राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी श्रीलंकेत तातडीने सार्वजनिक आणीबाणी घोषित करणारं राजपत्र जारी केलंय. राजपक्षे यावेळी म्हणाले की, सार्वजनिक सुरक्षा, सार्वजनिक सुव्यवस्थेचे संरक्षण आणि समुदायाच्या जीवनासाठी आवश्यक असलेल्या पुरवठा आणि सेवांची देखभाल या हितासाठी आणीबाणी घोषित करण्यात आली आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Success Story: लंडनमधील कोट्यवधींची नोकरी सोडली, पहिल्याच प्रयत्नात UPSC क्रॅक; IAS ऑफिसर दिव्या मित्तल यांची यशोगाथा

Viral Video: बाईक की टेम्पो! दुचाकीवरून ८ जणांचा प्रवास, पोलिसांनी जोडले हात, व्हिडीओ पाहून हैराण व्हाल!

PM Awas Yojana: PM आवाससाठी आता पोर्टलवरून अर्ज! १.८० लाखांची सबसिडी मिळणार, प्रक्रिया आणि कार्यप्रणाली कशी आहे?

Ajit Pawar : ताईंना CM करण्यासाठी अजित पवारांना बदनाम केलं, फडणवीसांचा आरोप, सुप्रिया सुळेंचा पलटवार

Shani Margi 2024: शनीच्या मार्गी चालीने अडचणी वाढणार; 'या' राशींवर राहणार शनिदेवाचं सावट!

SCROLL FOR NEXT