Snake Bites Wife
Snake Bites Wife Saam TV
देश विदेश

Snake Bites Wife : बाबो! पत्नीला सापाने केला दंश; बायको ऐवजी पतीने सापाला नेलं दवाखान्यात, पुढे काय घडलं?

Ruchika Jadhav

Snake News : साप चावताच त्या व्यक्तीवर त्वरीत उपचार न झाल्यास जीव जाण्याची शक्यता असते. साप हे नाव ऐकलं तरी अनेकांच्या काळजात धडकी भरते. अशात यूपीमधून एक विचित्र घटना समोर आली आहे. या घटनेमध्ये एका महिलेला साप चावला. साप चावल्यावर तिच्या पतीने केलेल्या कृत्याने सर्वच थक्क झाले आहेत. (Marathi News)

सापाचा दंश माणसाचा जीव घेतो. त्यावर लगेचच उपचार न झाल्यास व्यक्ती १०० टक्के दगावतो. यूपीच्या उमर अटवा या गावातील रहिवासी असलेला नरेंद्र त्याच्या पत्नीसह गावात राहतो. रोजच्याप्रमाणे सकाळी नरेंद्र कामावर गेला होता. तसेच त्याची पत्नी शेतात काम करण्यासाठी गेली होती. शेतात काम करताना नरेंद्रच्या पत्नीसोबत एक मोठी दुर्घटना घडली.

काम करताना अचानक तेथे एक साप आला. शेतात साप असल्याचे त्याच्या पत्नीला पटकन समजले नाही. ती कामातच मग्न होती. यावेळी सापाने तिच्या पायाला दंश केला. सापाचा दंश होताच ती मोठ्याने कळवळली. आपल्याला साप चावल्याचे समजताच तिने आरडाओरडा केला. तिचा आवाज ऐकून गावातील इतर व्यक्ती तेथे पोहचल्या.

साप चावल्याने तिला चक्कर देखील आली आणि ती धाडकन जमिनीवर कोसळली. यावेळी जमलेल्या व्यक्तींनी तिला जवळच्या दवाखान्यात दाखल केले. या सर्व घटनेची माहिती महिलेच्या पतीला म्हणजेच नरेंद्रला देण्यात आली. त्यावेळी त्याने तातडीने घराकडे धाव घेतली आणि सापाला दवाखान्यात आणले. महिलेच्या पतीने केलेल्या या कृत्याने सगळेच थक्क झाले. डॉक्टरही हे पाहून चक्रावले.

नरेंद्रला जेव्हा पत्नीविषयी ही माहिती मिळाली तेव्हा तिला पाहण्यासाठी २ मिनीटे देखील तो दवाखान्यात गेला नाही. त्याने लगेचच घरी धाव घेतली. घरी आल्यावर त्याने साप शोधला आणि पोत्यात भरून दवाखान्यात आणला. पतीचे असे म्हणणे होते की, त्याच्या पत्नीवर पुन्हाएकदा सापाच्या विषाने उपचार करावा. डॉक्टरांनी महिलेवर उपचार केला असून महिला आता सुखरुप असल्याचे समजले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan Lok Sabha: कल्याण लोकसभा मतदारसंघात राज ठाकरेंची सभा झाली तर आनंदच: श्रीकांत शिंदे

Maharashtra Politics: नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरेना? ठाकरेंच्या उमेदवाराची घौडदौड सुरुच

Maharashtra Politics 2024 : काँग्रेसचा विश्वजीत पैलवानासोबत; चंद्रहार पाटलांच्या प्रचारात सक्रीय

Maharashtra Politics 2024 : माढ्याच्या मैदानात फडणवीसांचा डबल धमाका; मोहिते- पवारांच्या गटात लावला सुरुंग

Health Tips: लसणाचे पाणी पिण्याचे फायदे ऐकून आजपासूनच प्यायला कराल सुरूवात

SCROLL FOR NEXT