Pune Crime News : पुण्यात १८-२० जणांच्या टोळक्याकडून वाहनांची तोडफोड; गोळीबार आणि कोयते घेऊन माजवली दहशत

Koyta Gang : झालेल्या गोंधळामध्ये एक व्यक्ती गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
Pune Crime News
Pune Crime NewsSaam TV

Pune News : पुण्यामध्ये कोयता गँगने काही महिन्यांपूर्वी नागरिक हैराण झाले होते. आता पुण्यात पुन्हा एकदा कोयता गँगने धुमाकूळ घालण्यास सुरूवात केली आहे. १८ ते २० जणांच्या टोळक्याकडून गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे . या टोळक्याने परिसरात दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला आहे. झालेल्या गोंधळामध्ये एक व्यक्ती गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. (Marathi News)

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, पुण्यातील पांडवनगर परिसरात २० हून अधिक गाड्यांची केली तोडफोड करण्यात आली आहे. यामध्ये लोखंडी हत्यारे, कोयते, तलवारी आणि लाकडी दांडक्यांचा वापर करत वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. तरुणांच्या टोळक्याने केलेल्या तोडफोडीमध्ये ४ चारचाकी, १४ दुचाकी आणि १ तीन चाकी गाड्या असे एकूण १९ गाड्यांचे नुकसान झाले आहे.

Pune Crime News
Satara Crime News: शेतजमिनीचा वाद विकोपाला; जावयाने चक्क चुलत सासऱ्यालाच संपवलं

परिसरात दहशत राहावी तसेच वर्चस्व राखण्यासाठी वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. या हल्ल्यात १ जण गंभीर जखमी झाला आहे. याच परिसरात टोळक्याकडून गोळीबार देखील करण्यात आला आहे. हातात कोयता आणि तलवारी घेऊन रस्त्यावर या टोळक्याने दहशत माजवलीये.

पुण्यात कोयता गँगच्या त्रासाला कंटाळून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. या गँगमधील अनेक तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे. अशात कोयता गँग हे प्रकरण आता कुठे शांत होत नाही तोच पुन्हा एकदा ही गँग सक्रिय झाल्याचे दिसत आहे.

Pune Crime News
Viral Video: पठ्ठ्यानं कहरच केला! गोल नाही तर चौकोनी चाकांची सायकल; रस्त्यावर चालते तरी कशी?

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com