Surat building collapse  ANI
देश विदेश

Surat Building Collapse Video : मोठी बातमी! सूरतमध्ये ६ मजली इमारत कोसळली; ढिगाऱ्याखाली दबून ७ जण ठार, अनेक जखमी

Surat Building Collapse update : गुजरातच्या सूरतमध्ये ६ मजली इमारत कोसळली आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. या घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Vishal Gangurde

गुजरात : गुजरातमधील सूरतमध्ये शनिवारी सहा मजली इमारत कोसळल्याची घटना घडली आहे. इमारत कोसळल्यानंतर घटनास्थळी एनडीआएफ, फायर ब्रिगेडचं पथकाने बचाव कार्य सुरु केलं आहे. या इमारतीच्या ढिगाऱ्याखालून ७ मृतदेह बाहेर काढले आहेत. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली आणखी लोक अडकल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. इमारत कोसळल्याच्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

इमारत कोसळल्याची घटना घडल्याची माहिती मिळताच प्रशासनाचे अधिकारी, सूरत महानगर पालिकेचे महापौर दक्षेश मावानी, उपमहापौर नरेंद्र पाटील, भाजप आमदार संदीप देसाई आणि विरोधी पक्षनेत्या पायल साकरियासहित अन्य नेते हजर झाले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सहा मजली इमारत पत्त्यासारखी कोसळली. इमारत कोसळल्याने अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकले. आतापर्यंत या घटनेत ७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.

सूरत पोलीस आयुक्त अनुपम गहलोत यांनी म्हटलं की, 'एसडीआरएफ आणि एनडीआरएफच्या पथकाने मदतकार्याला सुरुवात केली आहे. या इमारतीच्या पाच फ्लॅटमध्ये लोक राहत होते. त्यामुळे या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अनेक लोक अडकल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आतापर्यंत या इमारतीच्या ढिगाऱ्याखालून ७ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत'.

'या इमारतीच्या ढिगाऱ्याखालून एका महिलेला बाहेर काढण्यात आलं. या घटनेत महिला जखमी झाली आहे. या महिलेची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. पालिकेने या धोकादायक इमारतीला नोटीस देखील बजावली होती. घटनास्थळी एफएसएल पथकाकडून तपास सुरु आहे. पोलीस एफआयआर नोंद करुन पुढील कारवाई करणार आहे', असेही त्यांनी सांगितले.

पथकांकडून मदतकार्य सुरु

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सूरतमधील ही इमारात २०१७ साली बांधण्यात आली होती. त्यानंतर ही इमारत २०२४ मध्ये कोसळली आहे. ३२ फ्लॅट असलेल्या इमारतीत बहुतेक कुटुंब भाडेतत्वावर राहत होते. या इमारतीत बहुतेक कामगार राहत होते. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली किती कुटुंबातील लोक अडकले, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. या इमारतीच्या ढिगाऱ्याखालून एका महिलेला सुरक्षित बाहेर काढण्यात आलं आहे. सूरत अग्निशमन विभाग, पोलीस दल, एनडीआरएफचं पथकाकडून मदतकार्य सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : शिंदे गटाला मोठा झटका, मोठ्या नेत्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

Maharashtra Live News Update: राधाकृष्ण विखे पाटील मनोज जरांगे यांच्या भेटीला अंतरवाली सराटीत दाखल

Khare Shankarpali Recipe : यंदा दिवाळीला खास बनवा खुसखुशीत खारी शंकरपाळी, फक्त १० मिनिटांत रेसिपी तयार

Crime News : मामाच्या मुलीचा लग्नाला नकार, तरुण कमालीचा संतापला, चवताळलेल्या भावानं बाजारपेठेतच रक्तरंजित खेळ केला

WPL: आयपीएल ऑक्शनमध्ये मोठा बदल; खेळाडू रिटेनबाबत BCCIनं फ्रँचायझींना पाठवली गाइडलाइन

SCROLL FOR NEXT