Tarapith hotel fire six people killed saam TV
देश विदेश

Hotel Fire : झोपेतच काळाचा घाला! श्रावण सोमवारी मंदिराबाहेरील प्रसिद्ध हॉटेलमध्ये आग, ६ जण जिवंत जळाले अन्

Tarapith hotel fire six people killed : पश्चिम बंगालमधील बीरभूम जिल्ह्यात तारापीठ मंदिराजवळ चार मजली हॉटेलला पहाटे भीषण आग लागली. या दुर्घटनेत हॉटेलमध्ये झोपलेल्या ६ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत.

Namdeo Kumbhar

West Bengal breaking news : पश्चिम बंगालमधील वीरभूम जिल्ह्यातील प्रसिद्ध तारापीठ मंदिराजवळ एका चार मजली हॉटेलला सोमवारी पहाटे ४ वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. या दुर्दैवी घटनेत हॉटेलमध्ये झोपलेल्या ६ जणांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत. श्रावण सोमवार असल्याने तारापीठ मंदिरात दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती. त्याचवेळी मंदिराच्या जवळच असणाऱ्या हॉटेलमध्ये पहाटे ४ वाजता ही दुर्घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, आगीची सुरुवात हॉटेलच्या रिसेप्शन भागातून झाली आणि काही वेळातच ती संपूर्ण इमारतीत पसरली. रिसेप्शनमध्ये फायबरचे काम केलेले असल्याने आग अधिक वेगाने भडकली आणि परिसरात गडद काळा धूर पसरला. धुराचे लोट जास्त असल्याने बचाव पथकाला आत जाण्यात अडचणी येत होत्या.

प्राथमिक अंदाजानुसार शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा संशय वर्तवण्यात येत आहे. सध्या जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे आणि बचाव कार्य वेगाने सुरू आहे.

पश्चिम बंगालमधील स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, दुर्घनटाग्रस्त हॉटेल तारापीठ पोलीस ठाण्याजवळ आहे. हॉटेल मालकाचा दावा आहे की शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. पण अद्याप आगीच्या कारणाबाबत कोणतेही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास केला जात आहे. हॉटेलमधील आगीत जळून मृत्यू झालेल्या लोकांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी सरकारी रूग्णालयात पाठवले आहेत.

एबीपी बंगालीशी बोलताना भाविकांनी सांगितले की, हॉटेलमध्ये अचानक धूर पसरला आणि लोक पळू लागले. गडद काळ्या धुरामुळे पोलीस किंवा अग्निशमन दलाला घटनास्थळी प्रवेश करता आला नाही. रिसेप्शनची अंतर्गत रचना फायबरची बनलेली होती, त्यामुळे आग वेगाने पसरली. अग्निशामन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले असून सध्या कुलिंगचे काम सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

High cholesterol: रक्तवाहिन्यांमध्ये साचलेलं कोलेस्ट्रॉल 30 दिवसांत कमी कराचंय? आजच हे 3 बदल करा, लगेच दिसेल परिणाम

Nagpanchami Special : तुळजाभवानी मंदिरात पुरुष भाविकांना प्रवेश बंद, नेमकं काय कारण?

Maharashtra News Live Update: नागपुरातील कल्याणेश्वर शिव मंदिरात भक्तांची दर्शनासाठी गर्दी

BJP New Team: भाजपच्या नव्या राष्ट्रीय कार्यकारणीची घोषणा आज, कुणाला कोणती जबाबदारी मिळणार? संभाव्य यादी समोर

Famous Actress : ट्रेनमध्ये कपडे काढले, RPF कर्मचाऱ्यावर हल्ला केला; प्रसिद्ध अभिनेत्रीला अटक

SCROLL FOR NEXT