Manoj Pandey Saam Tv
देश विदेश

चीन सीमा वादावर लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे म्हणाले, स्थिती बदलू देणार नाही

सीमेवर परिस्थिती सामान्य आहे, कारवायांना चोख प्रत्युत्तर देण्यात आले आहे, असंही लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे म्हणाले.

साम वृत्तसंथा

नवी दिल्ली : या पदावरील सर्वोच्च प्राधान्य सर्व प्रकारच्या लढाईत वर्तमान आणि भविष्यातील आव्हानांना तोंड देण्यासाठी ऑपरेशनल सज्जतेचे उच्च दर्जा राखणे हे असेल. नियंत्रण रेषा (LOC) आणि वास्तविक नियंत्रण रेषेवर दोन्ही बाजूने परिस्थिती सामान्य आहे, असं लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे (Manoj Pandey) म्हणाले.

भारताने चीनला (China) सीमारेषेवर कोणतेदी बदल होणार नाहीत, हे स्पष्ट सांगितले असल्याचे पांडे म्हणाले. 'आमच्या सैन्याने महत्त्वाच्या ठिकाणांचा कब्जा केला आहे. कोणताही बदल होऊ देणार नाही आणि जमीन सोडणार नाही, असंही पांडे म्हणाले.

'मला वाटते की आमच्या शत्रूच्या प्रक्षोभक कृतींना बळजबरीने स्थिती बदलण्यावर योग्य प्रत्युत्तर दिले आहे'. आम्ही जमिनीत कोणताही बदल होऊ देणार नाही. दोन्ही बाजूने परिस्थिती सामान्य आहे, असंही लष्कर प्रमुख पांडे म्हणाले.

चीनशी चर्चा सुरूः लष्करप्रमुख

जनरल मनोज पांडे म्हणाले की, "भारत आणि चीन यांच्यात संवादाची प्रक्रिया सुरू आहे आणि आमचा विश्वास आहे की हाच पुढे जाणारा मार्ग आहे. आम्हाला विश्वास आहे की, आम्ही ही चर्चा पढे सुरु ठेवल्यास, आम्ही दोघंही यावर तोडगा काढू. वास्तविक नियंत्रण रेषेवरील तणाव कमी करणे आणि लवकरात लवकर परिस्थिती पूर्ववत करणे हे लष्कराचे उद्दिष्ट असल्याचे लष्करप्रमुख पांडे (Manoj Pandey)म्हणाले.

सीमेपलीकडून ड्रग्ज आणि शस्त्रास्त्रांची तस्करी

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांची संख्या वाढली आहे. नियंत्रण रेषेजवळ घुसखोरी आणि हिंसेचे प्रमाण कमी झाले आहे. पण या प्रभावाची कोणतीही चिन्हे नाही. काश्मीरमध्ये सीमेपलीकडून ड्रग्ज आणि शस्त्रास्त्रांची तस्करी होत आहे, असंही पांडे (Manoj Pandey) म्हणाले.

Edited By- Santosh Kanmuse

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: शेंद्रा एमआयडीसीत मोठा अपघात, कंपनीतील बॉयलर कोसळून ४ कामगार दगावल्याची भीती

Sanjay Raut : मुख्यमंत्री महाविकास आघाडीचाच होणार; संजय राऊत यांचा दावा

Maharashtra Election : राज ठाकरेंना नांदगावमध्ये धक्का; मनसे उमेदवाराची निवडणुकीतून माघार, ठाकरे गटात प्रवेश

Maharashtra Election: नाशिकमध्ये भाजप - ठाकरे गटात राडा; पोलीस ठाण्याबाहेरच आमनेसामने, VIDEO

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा गौरव – "रुखवत" लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार

SCROLL FOR NEXT