sikkim flood update 44 people have died So far 142 people missing  Saam TV
देश विदेश

Sikkim Floods: सिक्कीममधील महापुरात आतापर्यंत ४४ जणांचा मृत्यू, ४ जवानांचे मृतदेह सापडले, अनेकजण बेपत्ता

Sikkim Floods News: महापुरात मृत्यू झालेल्या लोकांचा आकडा आता ४४ वर पोहचला आहे. तर बेपत्ता लोकांची यादी एका रात्रीत दुप्पट होऊन १४२ वर पोहोचली आहे.

Satish Daud

Sikkim Floods News 

सिक्कीमध्ये बुधवारी रात्रीच्या सुमारास एक भयानक घटना घडली. लोनाक सरोवराचा परिसरात ढगफुटीसदृष्य पाऊस झाल्याने तीस्ता नदीला महापूर आला. या महापुरात भारतीय लष्कराचे २३ जवान वाहून गेले. यामधील ४ जवानांचे मृतदेह सापडले आहेत.

अजूनही १९ जवान बेपत्ता असून त्यांचा शोध घेतला जात आहे. सिक्कीम सरकारने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, तीस्ता नदीच्या महापुरात मृत्यू झालेल्या लोकांचा आकडा आता ४४ वर पोहचला आहे. (Latest Marathi News)

तर बेपत्ता लोकांची यादी एका रात्रीत दुप्पट होऊन १४२ वर पोहोचली आहे. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत ही संख्या ७८ होती. सिक्कीम सरकारने सांगितले की, ढगफुटीनंतर (Sikkim Flood) हिमनदीच्या तलावात पूर आल्याच्या तिसऱ्या दिवशी तिस्ता नदीच्या खाली सापडलेले सर्व ६ मृतदेह पाकयोंगमधील रहिवाशांचे आहेत.

मृतांचा आकडा झपाट्याने वाढू शकतो, अशी भीती देखील वर्तवली जात आहे. सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग यांनी पुरात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला प्रत्येक ४ लाखांची मदत जाहीर केली आहे. लाचेन, लाचुंग आणि चुंगथांगमधील बेपत्ता असलेल्या लोकांचा बचाव पथकाकडून हेलिकॉप्टरच्या मदतीने शोध घेतला जात आहे.

सिक्कीमची पोलीस (Police) यंत्रणा देखील शोधकार्य मोहिम राबवत असून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मंगन ते चुंगथांग असा पायी प्रवास सुरू केला आहे. दरम्यान, या महापुरात भारतीय लष्कराचे २२ जवान बेपत्ता झाल्याची अधिकृत नोंद करण्यात आली आहे.

या बेपत्ता जवानांचा शोध घेतला जात असून यातील ४ जवानांचे मृतदेह सापडले असल्याची माहिती लष्करी अधिकाऱ्यांनी दिली आहे. सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग यांनी पुरात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला प्रत्येक ४ लाखांची मदत जाहीर केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nag Panchami: नागपंचमीला चुकूनही 'ही' कामे करु नका

Maharashtra Live News Update: नांदूर-मध्यमेश्वर धरणातून गोदावरी पत्रात पाण्याचा विसर्ग वाढवला

Shocking News : संतापजनक! राजकीय वाद टोकाला, महिला मध्यरात्री उठली अन्...

Mithila Palkar: मिथिला पालकरचं वय वाढतय अन् सौंदर्यही खुलतय...

Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील सातही आरोपींची नावं समोर; कोकेन-गांजा, १० मोबईल अन् २ कार जप्त

SCROLL FOR NEXT