Karnataka Congress Government: कर्नाटकात अखेर काँग्रेसचे (Congress) सरकार स्थापन झालं आहे. विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर आज सिद्धरामय्या (Siddaramaiah) यांनी दुसऱ्यांदा कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. तर डीके शिवकुमार (DK Shivakumar) यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्याला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, माजी अध्यक्ष सोनिया गांधी, काँग्रेसचे नेते राहुल गांधी, प्रियांक गांधी यांनी उपस्थिती लावली.
कर्नाटक सरकारच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा सध्या सुरु आहे. सिद्धरामय्या यांनी आज कर्नाटकचे 30 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्याचसोबत कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी के शिवकुमार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गहलोत यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. बंगळुरू येथील कांटेरावा स्टेडियममध्ये हा शपथविधी सोहळा पार पडला.
या शपथविधी सोहळ्यात त्यांच्यासोबत आठ आमदारांनी देखील मंत्रीपदाची शपथ घेतली. या आमदारांमध्ये डीके आणि सिद्धरामय्या यांच्या छावणीतील निष्ठावंत आमदारांचा समावेश आहे. सिद्धारमैया यांच्या मंत्रिमंडळात दलित, मुस्लिम, लिंगायत आणि ख्रिश्चन समाजातील प्रतिनिधींचा समावेश करण्यात आला आहे. या शपथविधी सोहळ्याला काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांसह राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना नेते अनिल देसाई, शिवसेना नेत्या प्रियंका चतुर्वेदी, अभिनेते कमल हसन, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी हजेरी लावली.
कर्नाकच्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रसने भाजपचा दारुण पराभव केला. कर्नाटक विधानसभेवर आपला झेंडा फडकवण्यात काँग्रेसला यश आले. हे काँग्रेसचे सर्वात मोठे यश मानले जात आहे. कर्नाटकात काँग्रेसने भाजपचा पराभव करत 135 जागांवर विजय मिळवला. कर्नाटकच्या जनतेने काँग्रेसला पाठिंबा देत विजय मिळवून दिला. या निवडणुकीत भाजपला फक्त 66 जागांवर समाधान मानावे लागले. तर जेडीएसला फक्त 19 जागांवर विजय मिळवण्यात यश मिळालं.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.