Monsoon Update: अंदमानात मान्सून धडकला; 'या' तारखेला होणार महाराष्ट्रात आगमन

Weather Update: अखेर मान्सून अंदमानात धडकला आहे. अंदमान- निकोबार बेटांपैकी नानकोवरी बेटावर मान्सूननं हजेरी लावली आहे.
Maharashtra Monsoon News Update, Monsoon Latest Marathi News
Maharashtra Monsoon News Update, Monsoon Latest Marathi NewsSaam Tv
Published On

Monsoon Update News: दक्षिणपूर्व बंगालचा उपसागर, निकोबार आणि दक्षिण अंदमान समुद्राच्या काही भागात मान्सून दाखल झाला आहे अशी माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे. तर येत्या तीन-चार दिवसांत मान्सून दक्षिण बंगालच्या उपसागर, अंदमान समुद्र आणि अंदमान, निकोबारच्या आणखी काही भागांमध्ये पुढे सरकण्यासाठी परिस्थिती अनुकूल असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.  (Latest Marathi News)

Maharashtra Monsoon News Update, Monsoon Latest Marathi News
SSC-HSC Result 2023: दहावी-बारावीचा निकाल लवकरच; बोर्डाने दिली महत्वाची माहिती...

यावेळी मान्सून ४ जूनला केरळमध्ये (Kerala) दाखल होऊ शकतो. दरवर्षी केरळमध्ये 1 जूनला पावसाचं आगमन होतं. यंदा मात्र त्याला तीन दिवस उशीर होणार असल्याचा अंदाज आहे. साधारण 22 मे रोजी मान्सून हा अंदमानात दाखल होत असतो, मात्र या वर्षी या भागात मान्सून तीन दिवस आधीच दाखल झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

महाराष्ट्रात 9 ते 15 जूनपर्यंत मान्सूनचं आगमन

दुसरीकडे स्कायमेट या खासगी संस्थेच्या अंदाजानुसार महाराष्ट्रात (Maharashtra) मान्सूनचं आगमन 9 ते 15 जूनपर्यंत होण्याची शक्यता आहे. तर मुंबईत 15 जूनपर्यंत मान्सूनचे आगमन होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यंदा भारतामध्ये सरासरी 96 टक्के पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

दरवर्षी मान्सूनची वाटचाल कशी असते?

22 मे - अंदमान

1 जून - केरळ

7 जून - महाराष्ट्र

Maharashtra Monsoon News Update, Monsoon Latest Marathi News
Rs 2000 Exchange Last Date: बायबाय 2000 rs.; नोट बदलण्याची शेवटची तारीख डोक्यात फिट्ट करून ठेवा...

या भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता

दरम्यान, पुढील काही दिवसांत उत्तर-पश्चिम भारतात काही ठिकाणी उष्णतेची लाट येऊ शकते. दक्षिण उत्तर प्रदेशात 20 ते 22 मे दरम्यान, पश्चिम राजस्थान आणि उत्तर मध्य प्रदेशात 20 आणि 21 मे दरम्यान आणि छत्तीसगड आणि झारखंडमध्ये 21-23 मे दरम्यान उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. पुढील चार दिवसांत उत्तर-पश्चिम भारतात तापमानात २ ते ४ अंशांनी वाढ होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com