Karnataka Election Result
Karnataka Election Result Saam tv
देश विदेश

Karnataka Election Result: निकालाआधीच कर्नाटकात मुख्यमंत्रिपदासाठी काँग्रेस पक्षात शर्यत; शिवकुमार आणि सिद्धरामय्या यांची नावे चर्चेत

Vishal Gangurde

Karnataka Election Result 2023: कर्नाटकात काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली आहे. कर्नाटकात काँग्रेस १०० हून अधिक जागांवर आघाडीवर आहे. यामुळे कर्नाटकात काँग्रेस कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. याचदरम्यान, कर्नाटकात काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रिपदासाठी शर्यत सुरू झाली आहे. कर्नाटकात शिवकुमार आणि सिद्धरामय्या या दोघांची नावे मुख्यमंत्रिपदासाठी चर्चेत आहे. (Latest Marathi News)

कर्नाटकात २२४ जागांसाठीच्या विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. कर्नाटकाच्या या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने जोरदार मुसंडी मारली आहे. तर दुसरीकडे या निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला आहे.

काँग्रेसने बहुमताचा आकडा पार केला असून आतापर्यंत १२५ जागांवर आघाडीवर आहे. तर भाजप 7० जागांवर असल्याचे दिसत आहे. तर जेडीएस २६ जागांवर आघाडीवर आहे.

कर्नाटकातील या कलांवरून काँग्रेसची वाटचाल सत्ता स्थापनेकडे सुरू असल्याची चर्चा सुरू झाली आहे. एकीकडे कर्नाटकात काँग्रेसची सत्ता स्थापन करणार अशी चर्चा सुरू आहे. तर दुसरीकडे कर्नाटकात मुख्यमंत्रिपदासाठी शिवकुमार आणि सिद्धरामय्या या दोघांची नावे चर्चेत आहे.

बहुमताचा आकडा दिसताच काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रिपदासाठी चढाओढ

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत काँग्रेसला बहुमत मिळताना दिसत आहे. याचदरम्यान, काँग्रेसमध्ये संपूर्ण निकाल हाती येण्याआधीच मुख्यमंत्रीपदासाठी शर्यत सुरु झाली आहे.

सिद्धरामय्या यांचा मुलगा यतिंद्र यांनी वडिलांच्या नावावर मुख्यमंत्रीपदासाठी दावा केला आहे. माझ्या वडिलांना मुख्यमंत्रीपद मिळायला हवे, त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस स्वबळावर सत्ता मिळवण्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे ते म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan Lok Sabha: कल्याण लोकसभा मतदारसंघात राज ठाकरेंची सभा झाली तर आनंदच: श्रीकांत शिंदे

Maharashtra Politics: नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरेना? ठाकरेंच्या उमेदवाराची घौडदौड सुरुच

Maharashtra Politics 2024 : काँग्रेसचा विश्वजीत पैलवानासोबत; चंद्रहार पाटलांच्या प्रचारात सक्रीय

Maharashtra Politics 2024 : माढ्याच्या मैदानात फडणवीसांचा डबल धमाका; मोहिते- पवारांच्या गटात लावला सुरुंग

Health Tips: लसणाचे पाणी पिण्याचे फायदे ऐकून आजपासूनच प्यायला कराल सुरूवात

SCROLL FOR NEXT