Shyja Indian woman who flaunts her moustache
Shyja Indian woman who flaunts her moustache Twitter/@NishitDoshi144
देश विदेश

Kerala News: माझी मिशी माझा अभिमान! केरळच्या शाजयाने का ठेवल्या आहेत मिश्या?

Akshay Baisane | अक्षय बैसाणे

कन्नूर, केरळ: पिळादार मिशा या पुरुषाची शान असल्याचं समाजात समजलं जातं. तर लांब केस हे बाईचं सौंदर्य समजलं जातं. मात्र जर एका बाईला मिशा उगवल्या तर? होय, असं झालं आहे. केरळच्या कन्नूर (Kannur, Kerala)जिल्ह्यातील रहिवासी असलेली ३५ वर्षीय शायजा सध्या चर्चेत आहेत. वास्तविक, शायजाला पुरुषांप्रमाणे मिशा आहेत. अनेक स्त्रियांप्रमाणे, तिच्या अप्पर लिप्सवर केसांची वाढ खूप जास्त आहे. इतकेच नाही तर तिच्या भुवया आणि चेहऱ्यावरच्या इतर भागांवरचे केसंही वेगाने वाढतात. रिपोर्टनुसार, शायझाने स्वत:ला यासाठी आता तयार केले आहे, आणि आता ती आपले केस कापत नाही. पण स्वतःला असं स्विकारणं तिच्यासाठी सोपं नव्हतं. (Shyja Kerala woman flaunt facial hair)

हे देखील पाहा -

5 वर्षांपूर्वी केस कापणे बंद केले

जे लोक तिला पहिल्यांदा पाहतात ते नक्कीच विचारतात की शायझा तिच्या मिशा का कापत नाही. यावर शायजा म्हणते की, तिला तिचे केस खूप आवडतात आणि तिने स्वतःला तो मार्ग स्वीकारला आहे. पूर्वी ती नेहमी तिच्या चेहऱ्यांवरचे केस कापायची, पण अचानक ५ वर्षांपूर्वी तिला वाटले की आता तिला तिचे केस कापण्याची गरज नाही. जेव्हा तिचे केस दाट होऊ लागले, तेव्हा शायजाने केस पूर्णपणे साफ करणे बंद केले.

हरनाम कौरही आहे प्रसिद्ध

शायझा ही पहिली महिला नाही, जिला तिचे चेहऱ्यावरील केस आवडतात. इंग्लंडमध्ये राहणारी ३१ वर्षीय हरनाम कौर देखील याच शर्यतीत आहे आणि आता ती सोशल मीडियावर प्रसिद्ध झाली आहे. इन्स्टाग्रामवर १ लाखांहून अधिक लोक तिला फॉलो करतात. अलीकडेच एका वेबसाईटशी बोलताना हरनामने तिच्या आयुष्याविषयी मोकळेपणाने सांगितले आणि हार्मोन्सच्या असंतुलनामुळे महिलांना दाढी येण्यामुळे त्रास होतो असे सांगितले. हरनाम ११ वर्षांची असताना तिच्या मानेवर आणि हनुवटीवर केस येऊ लागले. वयाच्या १२ व्या वर्षी तिची आई तिला डॉक्टरांकडे घेऊन गेली, तेव्हा तिला पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम असल्याचे आढळून आले. तिच्या केसांची वाढ खूप जास्त होती, त्यामुळे तिने पुन्हा कधीही केस न कापण्याचा निर्णय घेतला.

समाजात लोकांनी असे अनेक नियम आणि कायदे बनवले आहेत ज्यात लोकांना जगावे लागते. ज्यांचा या नियम आणि कायद्यावर विश्वास नाही अशांना लोक विचित्र समजू लागतात. असेच नियम स्त्रियांच्या सौंदर्याशीही संबंधित आहेत. फक्त गोऱ्या स्त्रियाच सुंदर असतात, त्यांच्या भुवया, केस, चेहऱ्यावरचे केस हे सगळे सेट झाले पाहिजे, त्यांनी वजन कमी केले पाहिजे किंवा त्यांनी लाजून राहिले पाहिले अशी व्यवस्था या समाजात आहे. पण लोक हे विसरतात की स्त्रिया देखील मनुष्य आहेत आणि त्यांना स्वतःला जसं आहे तसं स्विकारण्याचा अधिकार आहे. हेच सत्य केरळच्या या महिलेने सिद्ध केले आणि अभिमानाने मिशा ठेवल्या आहेत.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: शिंदेंना उपमुख्यमंत्रीपद मिळू नये, म्हणून 2014 मध्ये ठाकरेंनी भाजपची ती ऑफर नाकारली: संजय शिरसाठ

Maharahstra Politics: शिंदेंच्या नावाला राष्ट्रवादी-भाजपचा विरोध; संजय राऊतांच्या दाव्यानं खळबळ

Maharashtra Politics 2024 : 'दादा-ताईमध्ये कधी भेद केला नाही'; 'सर्व सत्तापदं अजितदादांना, सुप्रिया केवळ खासदार'

Today's Marathi News Live: पुण्यातील हिट अँड रन प्रकरणी भाजपचं आंदोलन

RR-KKR चा सामना पावसाच्या पाण्यात वाहून गेला तर? कोणाचं होणार नुकसान?

SCROLL FOR NEXT