Shradha Walker Case Saam Digital
देश विदेश

Shradha Walker Case : श्रद्धा वालकर प्रकरणाला दिला 'लव्ह जिहाद'चा अँगल; चॅनलला ठोठावला ५० हजारांचा दंड

Sandeep Gawade

Shradha Walker Case

श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाला एका न्यज चॅनलने लव्ह जिहाद अँगल देऊन टीव्ही शो चालवला होता. याची दखल न्यूज ब्रॉडकास्टिंग आणि डिजिटल स्टँडर्ड्स अथॉरिटीने घेतली असून न्यूज १८ इंडिया चॅनलला ५०००० हजारांचा दंड ठोठावला आहे. तसेच या शोचे व्हिडिओ देखील काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत. अमन चोप्रा आणि अमिश देवगन या दोन अँकरनी हा शो चालवला होता.

ऑक्टोबर २०२२ मध्ये दिल्लीमध्ये राहणाऱ्या श्रद्धा वालकर या तरुणीची अत्यंत क्रुरपणे हत्या करण्यात आली होती. श्रद्धांचा लिव्ह-इन पार्टनर अफताब पुनावालाने तिची हत्या केली होती. हत्येनंतर श्रद्धाच्या मृतदेहाचे 35 तुकडे करून ते तीन आठवडे फ्रीजमध्ये ठेवले होते आले होते. त्यानंतर त्याने श्रध्दाच्या शरीराचा एक-एक तुकडा दिल्लीच्या वेगवेगळ्या भागामध्ये फेकून दिले. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी अफताबविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी 24 जानेवारी रोजी 6,629 पानांचे आरोपपत्र दाखल केले होते.

मात्र न्यूज १८ इंडियाने तीन शोमध्ये या प्रकरणाचा 'लव्ह जिहाद' असा उल्लेख केला होता. यामध्ये दोन शो अँकर अमन चोप्रा यांनी सादर केले होते. तर एक शो अमिश देवगण यांनी सादर केला होता. या शोच्या माध्यमातून जातीय रंग देण्याचा प्रयत्न केल्याचा ठपका ठेवण्यात आलेला आहे.

संपूर्ण देशाला हादरवून टाकणाऱ्या श्रद्धा वालकर हत्या प्रकरणी (Shraddha Walker Murder Case) दिल्ली हायकोर्टाने (Delhi High Court) मोठा निर्णय घेतला होता. या प्रकरणावर लक्ष ठेवून असणाऱ्या सर्व वृत्तवाहिन्यांना यापुढे या प्रकरणी दाखल आरोपपत्रातील मजकूर दाखवण्यास किंवा त्याची माहिती देण्यास मनाई करण्यात आली होती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rashi Bhavishya Today : श्री महालक्ष्मीची कृपा होणार, 'या' ६ राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार; वाचा तुमचे राशिभविष्य

Horoscope Today : गुंतवणुकीसाठी योग्य दिवस, मोठा फायदा होण्याची शक्यता; वाचा आजचे तुमचे राशीभविष्य

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

SCROLL FOR NEXT