Roja railway station train accident news Saam TV Marathi
देश विदेश

Train Accident : शॉर्टकटमुळे आयुष्य संपलं, ट्रेनच्या धडकेत आई-बापासह ५ जणांचा मृत्यू

Roja railway station train accident news : उत्तर प्रदेशमधील रोजा रेल्वे स्थानकाजवळ गरीब रथ एक्सप्रेसच्या धडकेत दुचाकीवरून रेल्वे रुळ ओलांडणाऱ्या आई-वडिलांसह पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

Namdeo Kumbhar

Garib Rath Express train accident Uttar Pradesh : गरीब रथ एक्सप्रेसने धडक दिल्यामुळे ५ जणांचा मृत्यू झाल्याची घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली आहे. बुधवारी संध्याकाळी साडेसहा वाजता रोजा रेल्वे स्थानकाजवळ ही दुर्देवी घटना घडली. १२२०४ गरीब रथ एक्सप्रेस जवळजवळ दोन तास उशिराने धावत होती. शाहजहांपूरच्या रोजा स्टेशनजवळ एका दुचाकीवरून पाच जण बेकायदेशीरपणे रेल्वे रुळ ओलांडत होते, त्यावेळी ट्रेनने त्यांना धडक दिली.

गरीब रथ एक्सप्रेसने रोजा रेल्वे स्थानकाजवळ धडक दिल्याने दोन मुलांसह पाच जण जागीच ठार झाले. हे पाच जण एकाच दुचाकीवरून बेकायदेशीरपणे रेल्वे रुळ ओलांडत होते. त्यांनी लवकर पोहचण्यासाठी शॉर्टकट घेतला होता, पण तोच शॉर्टकट जीवावर बेतला. या अपघातामुळे घटनास्थळी गोंधळ उडाला. मृतांच्या कुटुंबियांमध्ये शोककळा पसरली आहे.

उत्तर प्रदेशमधील बांका गावातील २६ वर्षीय हरिओम सैनी हे मेहुणा, मेहुणी अन् त्यांची मुलगी अन् मुलासोबत निघाले होते. ते निगोही परिसरातील बिक्रमपूर चाकौरा येथून बांकाकडे दुचाकीवरून जात होते. सायंकाळी ६:३० वाजता ते रोजा यार्ड परिसरातील एका अनधिकृत मार्गावरून रेल्वे रूळ ओलांडत होते. त्याचवेळी रेल्वेने धडक दिली अन् जीव गेला.

प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, दूरवरून येणारी ट्रेन पाहून हरिओमने एका ट्रॅकवरच बाईक थांबवली. त्याचवेळी विरुद्ध मार्गावरून जाणारी ट्रेन समजली. परंतु अमृतसरहून सहरसा येथे जाणारी १२२०४ गरीब रथ एक्सप्रेस त्याच ट्रॅकवर वेगाने आली. लोको पायलटने हॉर्न वाजवून बाईकस्वारांना सावध करण्याचा प्रयत्न केला. पण काही जमजण्याच्या आत ट्रेनने पाच जणांना चिरडले. ही धडक इतकी भीषण होती की दुचाकीसह पाचही जण ट्रेनमध्ये अडकले. या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. लोको पायलटने आपत्कालीन ब्रेक लावले आणि ट्रेन थांबवली. अपघातानंतर घटनास्थळी आरडाओरडा झाला. रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आणि स्थानिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आले. रोजा स्टेशनजवळ ट्रेन सुमारे अर्धा तास उभी राहिली. ट्रॅक मोकळा केल्यानंतर ट्रेन पुढे पाठवण्यात आली. सर्व मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी पाठवण्यात आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : पालक-चिकन खाल्ल्यामुळे एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू, डॉक्टरांनी सांगितली नेमकी चूक

Maharashtra Live News Update : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री सुरुपसिंग नाईक अनंतात विलीन...

BJP Leader Shot Dead: भाजप नेत्याची गोळ्या झाडून हत्या, दुचाकीवरून आलेल्या चौघांनी घरासमोरच धाडधाड गोळ्या झाडल्या

Accident : चालकाला डुलकी लागली अन् कार पुलावरून कोसळली, ४ जणांचा जागीच मृत्यू, ५ गंभीर

Silver Price: २० वर्षांपूर्वी 1KG चांदीची किंमत किती होती? १५०० टक्क्यांनी झाली वाढ

SCROLL FOR NEXT