Two Girls Fight For same man at bhopal : एका तरुणासाठी दोघींमध्ये भांडण, एकमेकींना लाथा घातल्या AI image
देश विदेश

Love triangle : आधी बाचाबाची, नंतर कुटाकुटी; एकाच तरुणावरून दोन तरूणींचा पोलीस ठाण्यातच राडा

Madhya Pradesh News : एकाच तरुणासाठी दोन तरूणी भिडल्याची घटना मध्य प्रदेशातील भोपाळ येथील पोलीस ठाण्यात घडली. या प्रकरणी दोन्ही बाजूंनी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.

Nandkumar Joshi

मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये अजबगजब प्रेमाचा मामला समोर आला आहे. पोलीस ठाण्यातच प्रेमासाठी घमासान युद्ध पेटलं. शहरातील शाहजहांनाबाद पोलीस ठाण्याच्या आवारातच दोन तरूणींमध्ये जबरदस्त भांडण झालं. आधी दोघींमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर प्रकरण हाणामारीपर्यंत गेलं. शहरात शांतता राखणाऱ्या पोलिसांसमोरच हा सगळा प्रकार घडला. या दोन तरुणींमधील हाणामारीचं कारण समजल्यानंतर सगळेच हैराण झाले.

मध्य प्रदेशातील भोपाळ शहरातील शाहजहांनाबाद पोलीस ठाण्याच्या आवारात ही घटना घडली. प्रेमासाठी वाटेल त्या म्हणणाऱ्या दोन तरूणींमध्ये हाणामारी झाली. दोघींनी एकमेकींना लाथाबुक्क्यांनी तुडवलं. एका तरुणावर दोघींचं प्रेम जडलं होतं. त्याच्यावरूनच दोघींमध्ये आधी बाचाबाची झाली. त्याचं पर्यावसन हाणामारीत झालं. या घटनेमुळं पोलीस ठाण्याच्या परिसरातील वातावरण तापलं होतं.

वाद कशावरून?

एका तरुणासाठी त्या दोन तरुणींमध्ये मोठा वाद झाला. त्यातील एका तरुणीचा साखरपुडा झाल्याचं सांगण्यात येत आहे. एक तरुणी गुरुवारी शहरातील शाहजहांनाबादच्या पोलीस ठाण्यात पोहोचली. तिनं पोलिसांकडं अर्ज दिला. तिचं एका तरुणाशी लग्न ठरलं आहे. दोघांचा साखरपुडाही झाला आहे. आता तिच्या होणाऱ्या नवऱ्याच्या घराशेजारी राहणारी तरुणी त्याच्यावर लाइन मारते, असा आरोप तरुणीने केला. तिला अनेकदा समज देण्यात आली, पण ती काही केल्या ऐकत नाही, असं तिचं म्हणणं आहे.

पोलीस ठाण्यातच हाणामारी

तरुणीच्या तक्रार अर्जानंतर पोलिसांनी दुसऱ्या तरुणीला पोलीस ठाण्यात बोलावून घेतलं. ती तरुणी आपल्या कुटुंबीयांसोबत पोलीस ठाण्यात आली. हा वाद सोडवण्यासाठी त्यांच्यात चर्चा सुरू होती. त्यावेळी दोन्ही तरुणींमध्ये बाचाबाची झाली. बघता बघता वाद चिघळला. त्या दोघींची शाब्दिक चकमक हाणामारीपर्यंत गेली. दोघींनी एकमेकींना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या वादात दोघींचे कुटुंबीय पोहोचले. त्यानंतर वातावरण तापलं. दोघांचे कुटुंबीय एकमेकांना भिडले. जोरदार हाणामारी झाली.

तरुणीचे तरुणावर आरोप

पोलीस ठाण्यात दुसऱ्या तरुणीने त्या तरुणावर गंभीर आरोप केले. मी त्या मुलाशी बोलतही नाही आणि त्याला कुठलाही त्रास देत नाही, असं म्हणणं तिनं मांडलं. उलट तो तरूणच माझ्या मागे लागला आहे. मला त्रास देत आहे, असा आरोप तिने केला. या सगळ्या गोंधळानंतर दोघांनीही परस्परविरोधी तक्रारी दाखल केल्या. त्यावरून पोलिसांनी एफआयआर दाखल करून घेतला असून, तपास सुरू केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Driving Licence: आता घरबसल्या करा मिळवा ड्रायव्हिंग लायसन्स, जाणून घ्या संपूर्ण ऑनलाइन प्रक्रिया

Heavy Rain : मुसळधार पाऊस; वारणा धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग, कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ

Kumbh Rashi : कुंभ राशीचा आजचा रविवार जाणार कसा? वाचा स्पेशल राशीभविष्य

Rohini Khadse: कोण आहे रोहिणी खडसे? जाणून घ्या त्यांच्याविषयी

Maharashtra Live News Update: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांची इच्छा - नितेश राणे

SCROLL FOR NEXT