अध्यात्मिक गुरु भय्यू महाराज यांच्या आत्महत्येचे गूढ, प्रकरणात नवीन खुलासा Saam Tv
देश विदेश

अध्यात्मिक गुरु भय्यू महाराज यांच्या आत्महत्येचे गूढ, प्रकरणात नवीन खुलासा

अध्यात्मिक गुरु भय्यू महाराज यांच्या आत्महत्या प्रकरणामध्ये अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वृत्तसंस्था : अध्यात्मिक गुरु भय्यू महाराज यांच्या आत्महत्या प्रकरणामध्ये अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. भय्यू महाराज यांना पलक नावाची तरुणी अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन त्रास देत असल्याचे आता समोर आले आहे. 26 नोव्हेंबर दिवशी न्यायालयात तब्बल १०९ पानाचे व्हॉट्सअ‍प चॅट न्यायालयात सादर करण्यात आले आहे. पलकच्या त्रासाला कंटाळूनच भय्यू महाराज यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे पोलीस तपासामध्ये समोर आले आहे.

हे देखील पहा-

फॉरेन्सिक टीमने सादर केलेल्या अहवालामध्ये पलक(Bhayyu Maharaj) नावाची तरुणी पीयूष जीजू नावाच्या एका व्यक्तीबरोबर व्हॉट्सअपद्वारे चॅट करत असल्याचे समोर आले आहे. यामधून काही तथ्य समोर आल्याचा दावा केला जात आहे. यामुळे भय्यू महाराज प्रकरण हे एक खूप मोठे षडयंत्र होते, असे आता उघड झाले आहे.

भय्यू महाराज यांनी टोकाचे पाऊल उचलल्यावर पोलिसांनी पलकसह आणखी काही जणांना अटक करण्यात आली होती. सर्व आरोपींचे मोबाईल जप्त करण्यात आले होते. सर्व आरोपींच्या मोबाईल चॅटिंगचा डेटा देखील रिकव्हर करण्यात आला होता. या चॅटमधून जी माहिती समोर आली. ती पाहून पोलिसांना देखील मोठा धक्का बसला आहे. आरोपी चॅटिंग करताना भय्यू महाराज यांचा उल्लेख BM या सांकेतिक नावाने करत असत. एका चॅटमध्ये तर त्यांनी केलेला उल्लेख अत्यंत धक्कादायक आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी महिलांची मोठी गर्दी, बँकेबाहेर दिसल्या भल्यामोठ्या रांगा

Nandurbar : चिमुकल्या विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास; नेसू नदीवर पूल नसल्याने पुरातून काढावा लागतो मार्ग

Maharashtra Live News Update : मनसेचे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांची नोटीस

Political News : मराठी माणसांना भडकावून मते मिळवणे हाच ठाकरेंचा उद्देश; शिंदे गटाची आगपाखड

Sharad Pawar: महाराष्ट्रात शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांचे राज्य पुन्हा उभे करावे लागेल- शरद पवार|VIDEO

SCROLL FOR NEXT