Jharkhand Crime  Saam Tv
देश विदेश

Shocking: शिक्षकाने विद्यार्थिनींसोबत केली 'गंदी बात', शरीरसंबंधासाठी जबरदस्ती; विचारला अंडरवेअरचा रंग

Jharkhand Crime: झारखंडमध्ये भयंकर घटना घडली आहे. या ठिकाणी एका शाळेतील शिक्षकाने विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण केले. त्याने विद्यार्थिनींना मेसेज पाठवून त्यांच्या अंडरवेअरचा रंग विचारला. तसंच त्यांना शरीरसंबंधासाठी दबाव टाकला.

Priya More

गुरु आणि शिष्य यांच्यातील नाते हे जगातील सर्वात पवित्र नात्यांपैकी एक आहे. आपल्या देशात गुरुला खूप महत्त्वाचे स्थान आहे आणि त्यांना आदर्श मानले जाते. शिक्षक हे फक्त विद्यार्थ्यांना शिकवण देत नाही तर त्यांच्या जीवनाचे मार्गदर्शक देखील असतात. पण झारखंडमधील एका शिक्षकाच्या कारमान्यामुळे गुरु-शिष्याच्या पवित्र नात्याला काळिमा फासला गेलाय. येथील शिक्षकाच्या कृत्यामुळे पालकांना मुलांना शाळेत पाठवणं सुद्धा सुरक्षित वाटत नाहीये.

मिळालेल्या माहितीनुसार, रांचीच्या रतु रोडवरील एका सरकारी अनुदानित शाळेतील शिक्षक अभिषेक कुमार सिंगने शाळेत शिकणाऱ्या १२ हून अधिक विद्यार्थिनिंसोबत अश्लीलतेच्या मर्यादा ओलांडल्या आहेत. हा शिक्षक विद्यार्थिनींना अश्लील मेसेजेस पाठवायचा. व्हॉट्सअॅप चॅट दरम्यान या शिक्षकाने विद्यार्थिनींना त्यांच्या अंतर्वस्त्रांच्या रंगाबद्दल विचारणा केल्याचा आरोप आहे. त्याने त्यांना शारीरिक संबंध बनवण्यासाठी प्रवृत्त केले आणि व्हिडिओ कॉल देखील केले.

रांचीचे उपायुक्त मंजुनाथ भजंत्री यांना शिक्षकाने अश्लीलतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्याची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ रांची जिल्ह्यातील डीईओ आणि डीएसओ यांना प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांनी एक तपास पथकही स्थापन केले आहे. त्यांनी शाळेत जाऊन संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली आहे.

शिक्षण सचिव रांची यांच्या नावाने एक निनावी पत्र लिहिले होते. त्यात लिहिले होते की, रांचीतील रतु रोड येथील एका शाळेतील शिक्षक अभिषेक कुमार सिंह हे शाळेत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण करत आहेत. हा शिक्षक व्हॉट्सअॅपद्वारे विद्यार्थिनिंशी अश्लील चॅटिंग करत आहे. त्यांच्यावर शरीरसंबंध ठेवण्यासाठी आणि व्हिडिओ कॉलवर बोलण्यासाठी दबाव आणला जात होता.

एका अल्पवयीन मुलींना हॉटेलमध्ये नेल्याचे प्रकरणही समोर आले आहे. विद्यार्थिनींनी तक्रार केल्याचे लक्षात येताच हा शिक्षक शाळेत येणं बंद झाले. सध्या या प्रकरणाची चौकशी होत आहे. जर हा शिक्षक दोषी आढळला तर त्याच्याविरोधात पोक्सो कायद्यांतर्गत कारवाई केली जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पंढरपूरात अतिवृष्टीचा अंदाज, सीना नदीला पुन्हा पुराचा धोका; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Maharashtra Rainfall: नागरिकांनो सतर्क राहा! आजपासून पाऊस पुन्हा जोर धरणार, कोकण- विदर्भ अन् मराठवाड्यात जोरदार बॅटिंग

Anganwadi Workers: अंगणवाडी सेविकांची दिवाळी गोड होणार! सरकारकडून भाऊबीज गिफ्ट; २००० रुपये मिळणार

Jio New Recharge Plan: भन्नाट ऑफर! १०० रुपयांत मिळणार हजारो रुपयांचे फायदे; डेटा, मनोरंजन आणि अतिरिक्त ऑफर्स फ्री

Success Story: सरकारी नोकरी सोडली, UPSC परीक्षेत दोनदा फेल, जिद्द नाही सोडली, तिसऱ्या प्रयत्नात IAS; सर्जना यादव यांचा प्रवास

SCROLL FOR NEXT