माऊलीनगरात मोकाट कुत्र्याने पाच वर्षीय बालकावर हल्ला करून मानेचा लचका तोडला.
जखमी बालकावर जिल्हा सामान्य रुग्णालयात तातडीने उपचार सुरू आहेत.
नागरिक प्रशासनाविरोधात संताप व्यक्त करत असून कारवाईची मागणी करत आहेत.
मोकाट कुत्र्यांचा प्रश्न न सुटल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
जळगाव शहर पुन्हा एकदा मोकाट कुत्र्यांच्या दहशतीने हादरले आहे. माऊली नगर परिसरात एका पाच वर्षीय चिमुरड्यावर मोकाट कुत्र्याने भयंकर हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात चिमुकल्याच्या मानेचा मोठा लचका तोडला गेला असून, तो गंभीर जखमी झाला. त्यानंतर जिल्हा सामान्य रुग्णालयात त्याच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, माऊली नगर परिसरातील रहिवासी रवींद्र सुनील पाटील आपल्या कुटुंबासह येथे वास्तव्यास आहेत. त्यांचा पाच वर्षीय मुलगा समर्थ रवींद्र पाटील दुपारी शाळेतून घरी परतल्यावर अंगणात सायकल चालवत होता. अचानक परिसरात फिरणाऱ्या एका मोकाट कुत्र्याने त्याच्यावर जोरदार झडप घातली. कुत्र्याने समर्थच्या मानेवर चावा घेत मोठा लचका तोडला.
अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे घरात ओरड ऐकून आई-वडील बाहेर धावले आणि त्यांनी तातडीने कुत्र्याच्या तावडीतून मुलाला सोडवले. रक्ताच्या थारोळ्यात असलेल्या समर्थला तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात पोहचल्यावर डॉक्टरांनी सांगितले की जखम गंभीर असून उपचार सुरू आहेत.
या घटनेमुळे माऊली नगर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे. जळगाव महापालिकेच्या दुर्लक्षामुळे मोकाट कुत्र्यांचा प्रश्न गंभीर झाला असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. गेल्या काही वर्षांत शहरातील विविध भागांत कुत्र्यांच्या हल्ल्याच्या घटना घडत असून, त्यातून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. तरीही या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघालेला नाही.
स्थानिक नागरिकांनी तातडीने प्रशासनाने कुत्र्यांवर नियंत्रण ठेवावे आणि अशा घटना टाळण्यासाठी ठोस पावले उचलावीत, अशी मागणी केली आहे. या घटनेनंतर माऊली नगरात मोठी खळबळ उडाली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.