Jalgaon News: 'माझ्यासारखी चूक तुम्ही करू नका...', गर्लफ्रेंडने दिला धोका, तरुणाने सोशल मीडियावर VIDEO टाकत संपवलं आयुष्य

Jalgaon Youth Ends Life After Love Rejection: जळगाव जिल्ह्यात प्रेयसीने नकार दिल्याने एका तरुणाने आत्महत्या केली. मृत्यूपूर्वी त्याने इंस्टाग्रामवर भावनिक व्हिडीओ शेअर केला. पोलिस तपास सुरू असून गावात खळबळ उडाली आहे.
Jalgaon News
Jalgaon NewsSaam Tv
Published On

प्रेम हे आंधळं असतं. प्रेमासाठी कोणीही काहीही करायला तयार होते. सोशल मीडियावर याचे अनेक व्हिडीओ देखील व्हायरल होतात. नुकतंच एका तरूणाला प्रेमात अपयश आल्याने त्याने मोठं पाऊल उचललं आहे. त्याने आत्महत्या केली आहे. आत्महत्या करण्यापूर्वीचा व्हिडिओ त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

Jalgaon News
Viral Video: बहीण बॉयफ्रेंडसोबत छोले-भटुरे खात होती, भाऊ आला अन् भर रस्त्यात घातला राडा, पब्लिक कोमात

महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात ही घटना घडली आहे. प्रेयसीने नकार दिल्याने एका तरूणाने मोठं पाऊल उचललं आहे. त्याने आत्महत्या केली आहे. आत्महत्यापूर्वी त्याने रडत रडत त्याचं दु:ख व्यक्त केलं आहे. अत्यंत वेदनादायी व्हिडीओ त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे. प्रेमासाठी माणूस किती टोकाचे पाऊल उचलतो, हे यावरून सिद्ध झालं आहे. प्रेयसीने नकार दिल्याने तरूणाने जीवन संपवले आहे.

रवींद्र बोरसे असं या आत्महत्या करणाऱ्या मुलाचे नाव आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये हा तरूण रडत त्याच्या भावना व्यक्त करत आहे. 'तो म्हणतोय की, मी एक गरीब मुलगा आहे. त्याचे एका मुलीवर प्रेम होते. मात्र प्रेमाच्या जाळ्यात अडकल्यानंतर काही दिवसाने त्याची प्रेयसी त्याचे खरे प्रेम विसरली आहे. त्याने इतरांना आयुष्यात सर्वकाही करण्याचा, अभ्यास करण्याचा आणि मोठे होण्याचा सल्ला दिला आहे मात्र प्रेमाच्या जाळ्यात अडकून जाऊ नका असे सांगितलं आहे. पुढे त्याने, मी स्वत: जी चूक करणार होती ती तुम्ही करू नका असं देखील म्हणतो आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर, गौरवने गावातील झाडाला गळफास लावून आत्महत्या केली आहे. गावातील झाडाला आत्महत्या केल्यानंतर संपूर्ण गावात ही बातमी पसरली. या घटनेची माहिती पोलिसांना दिली. सध्या पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

Jalgaon News
Viral Video: मराठीत बोलणार नाही तर महाराष्ट्रात ठेवणार नाही; लोकलमध्ये हिंदीत बोलणाऱ्या तरुणीवर महिला भडकली, VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com