Solapur Shocking: माझ्या अंगावर गाडी का घातली? बस थांबवत पैलवानानं एसटी चालकाची गचांडी पकडली | Video Viral

Solapur ST Bus Driver- Biker Fight: सोलापूरमध्ये एसटी बस चालक आणि दुचाकीस्वारामध्ये धक्काबुक्की झालीय. दुचाकीस्वाराच्या अंगावर चिखल पडल्याने त्याने एसटी चालकाची गचांडी पकडली.
Solapur ST Bus Driver- Biker Fight:
Solapur breaking news: ST bus driver and biker clash after mud splash on roadSaam tv
Published On
Summary
  • सोलापूरमध्ये चिखल अंगावर उडाल्याने वाद उफाळला.

  • एसटी चालक आणि दुचाकीस्वारामध्ये बाचाबाची झाली.

  • संतापाच्या भरात दोघांनी एकमेकांची गच्ची पकडली.

  • घटनेने स्थानिक नागरिकांमध्ये चर्चा रंगली.

विश्वभुषण लिमये, साम प्रतिनिधी

राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना नद्यांचे स्वरुप आलं होतं. आता पावसाने उसंत घेतल्याने पाणी ओसरलंय. पावसामुळे रस्त्यांच्या आजूबाजुला खड्डे पडले आहेत. पण खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यानं चिखल झाला असून या चिखलामुळे वाहन चालकांमध्ये हमरीतुमरी होताना दिसत आहे. सोलापूर जिल्ह्यामधील कुर्डू गावातील रस्त्यावर एसटी बस चालक आणि दुचाकीस्वाराची बाचाबाची झालीय.

चिखल अंगावर उडल्याने एसटी चालक आणि दुचाकीस्वारामध्ये धक्काबुक्की झालीय. एसटी बस थांबवून दुचाकीस्वारानं एसटी बस चालकाची गचांडी पकडत धक्काबुक्की केलीय. ही घटना सोलापूर जिल्ह्यातील बार्शी ते कुर्डूवाडी रोडवर घडली. एसटी बस जात असताना दुचाकीस्वाराच्या अंगावर चिखल उडालं होतं.

त्यानंतर एसटी चालक आणि दुचाकीस्वारामध्ये बाचाबाची झाली. दोघांनी एकमेकांची गचांडी पकडत शिवीगाळ केली. दरम्यान सदरच्या प्रकरणात नेमकी चुकी कुणाची हा प्रश्न असला तरी भर रस्त्यात झालेल्या वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय.

Solapur ST Bus Driver- Biker Fight:
Bus Accident : बस- ट्रकचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू, पारोळा- भडगाव रस्त्यावरील घटना

बस कंडक्टरकडून विद्यार्थिनींना शिवीगाळ

शालेय विद्यार्थिनींना एका बस कंडक्टरने अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याचा धक्कादायक प्रकार नंदुरबार बस स्थानकावर घडला. संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने आक्रमक भूमिका घेत कंडक्टरवर कारवाईची मागणी केलीय. बसमध्ये विद्यार्थ्यांची प्रचंड गर्दी होती. बसमध्ये चढताना जागा मिळत नसल्याने काही शालेय विद्यार्थी आणि विद्यार्थिनी बस कंडक्टरकडे विचारणा केली.

याचवेळी कंडक्टरने उद्धटपणे आणि अश्लील भाषेत त्यांना शिवीगाळ केली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते तात्काळ घटनास्थळी पोहोचले. त्यांनी नंदुरबार बस आगाराच्या अधिकाऱ्यांना घेराव घातला. काहीवेळा वाद झाल्यानंतर कंडक्टरनं माफी मागितली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com