Vande Bharat Express saam tv
देश विदेश

Vande Bharat Express : वंदे भारत ट्रेनच्या जेवणात चक्क लोखंडी बोल्ट! प्रवाशाच्या तक्रारीनंतर IRCTC ची मोठी कारवाई

IRCTC Food Quality : बंगळुरू ते बेळगावी वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये प्रवाशाला जेवण्यातल्या वड्यात लोखंडी बोल्ट आढळल्याचा दावा आहे.

Sakshi Sunil Jadhav

वंदे भारत एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाला जेवणात चक्क लोखंडी बोल्ट सापडल्याची धक्कादायक घटना समोरी आली आहे. बंगळुरू ते बेळगावी या मार्गावर प्रवास करताना प्रवाशाला जेवणात दिलेल्या वड्यात मोठा धातूचा बोल्ट आढळला. या प्रकारामुळे रेल्वेतल्या खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेचा आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न परत एकदा ऐरणीवर आलाय.

वड्यात आढळला मोठा लोखंडी बोल्ट

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित प्रवासी बंगळुरूहून बेळगावीला वंदे भारत ट्रेनने प्रवास करत होता. प्रवासाच्या वेळेस त्याला जेवणाचा भाग म्हणून वडापावऐवजी दिलेल्या वड्यात मोठा धातूचा बोल्ट आढळल्याचा दावा करण्यात आला. जेवणात अशी वस्तू आढळल्याने प्रवाशाला धक्का बसला. त्यानंतर त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून या प्रकाराची माहिती शेअर केली. तसेच भारतीय रेल्वे आणि इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन चौकशी करावी, अशी मागणी केली.

IRCTC कडून प्रवाशाची माफी

प्रवाशाच्या तक्रारीची दखल घेत IRCTC ने प्रतिक्रिया दिली. या प्रकारामुळे झालेल्या गैरसोयीबद्दल संस्थेने दिलगिरी व्यक्त केली. तसेच संबंधित सेवा पुरवठादाराविरोधात कठोर दंडात्मक कारवाई करण्यात आल्याचे स्पष्ट केले.

किचनची तपासणी करण्याचे आदेश

IRCTC ने संबंधित किचन युनिटमधील कर्मचाऱ्यांना खाद्यपदार्थ तयार करताना निर्धारित मानक कार्यपद्धतीचे (SOP) काटेकोर पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच संबंधित अधिकाऱ्यांना किचनची सखोल तपासणी करायला सांगितली. अन्न तयार करण्यापूर्वी वापरली जाणारी सर्व उपकरणं योग्य स्थितीत आहेत की नाहीत, याची खात्री करण्याचेही निर्देश देण्यात आलेत.

रेल्वेतल्या खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह

वंदे भारतसारख्या प्रीमियम ट्रेनमध्ये प्रवाशांना चांगल्या दर्जाचे जेवण मिळणं अपेक्षित असतं. पण जेवणात धातूची वस्तू आढळल्याच्या या घटनेमुळे रेल्वेच्या खाद्यपदार्थांच्या स्वच्छतेबाबत आणि गुणवत्ता नियंत्रणाबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. प्रवाशांच्या आरोग्याशी संबंधित अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी रेल्वे आणि IRCTC कडून अधिक कठोर देखरेख होणं गरजेचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Breaking News : राजकारणात खळबळ! बड्या नेत्याने सोडली आम आदमी पक्षाची साथ

Kitchen Vastu Tips: किचनमध्ये कचरा किती वेळ ठेवला पाहिजे? तो कधी बाहेर टाकावा? वास्तुशास्त्रात सांगितलेत खास नियम

टॉयलेट स्वच्छ कसा करायचा?

Maharashtra News Live Update: महिला आरक्षणावर निलम गोऱ्हेंचा काँग्रेसवर निशाणा; ‘पक्षात ५० टक्के आरक्षण का दिलं नाही?’

8th Pay Commission : आठव्या वेतन आयोग 2028 पर्यंत लांबल्यास काय होणार? सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी

SCROLL FOR NEXT