गेल्या काही दिवसांपासून घसरत असलेल्या सोनं-चांदीच्या किंमतीत आता पुन्हा वाढ होईल. मागच्या दोन दिवसात सराफा बाजारासोबत कमोडिटी मार्केटमध्येदी दोन्ही मौल्यवान धातूंच्या किंमती वाढल्या आहेत. फक्त एका आठवड्यात सोनं २ हजारांपेक्षा जास्त तर चांदीच्या किंमतीत जवळपास २ हजार रुपयांची वाढ झाली. त्यामुळे सोनं-चांदी खरेदी करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे.
IBJA च्या आकडेवारीनुसार, २० नोव्हेंबर रोजी २४ कॅरेट सोन्याचा भाव १,२३,८९३ रुपये प्रति १० ग्रॅम होता. २७ नोव्हेंबरपर्यंत हा दर वाढून १,२६,२९९ रुपये झाला. म्हणजेच आठवड्याभरात सोन्याच्या किंमतीत २,४०६ रुपयांनी वाढ झाली. सध्या सोनं १.२५ लाखांच्या पुढे पोहोचलं आहे.
सोन्याप्रमाणेच चांदीच्या किंमतीतही वाढ झाली. २० नोव्हेंबरला चांदीचा भाव १,५२,५२८ रुपये प्रति किलो होता. २७ नोव्हेंबरला तो वाढून १,५४,३०० रुपये प्रति किलो झाला. म्हणजेच आठवडाभरात चांदी १,७७२ रुपयांनी महागली आहे.
IBJA च्या माहितीनुसार, २२ कॅरेट सोन्याचा भाव १,१४,७८९ रुपये प्रति १० ग्रॅम, तर १८ कॅरेट सोन्याचा भाव ९३,९८७ रुपये प्रति १० ग्रॅम झाला.
सोनं-चांदीच्या किमती वाढण्यामागे अनेक कारणं आहेत. किंमतीत झालेल्या घसरणीनंतर गुंतवणूकदारांकडून पुन्हा खरेदी सुरू झाली. तसेच अमेरिकन डॉलर कमकुवत होणं आणि अमेरिकन बाजारातली तेजी यामुळेही मौल्यवान धातूंच्या किंमतींना आधार मिळाला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.