Manasvi Choudhary
टॉयलेट स्वच्छ ठेवणे हे आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.
परंतु, टॉयलेट कितीही स्वच्छ केले तरी रोजच्या वापरामुळे खराब होते. काही काळाने त्यावर पुन्हा पिवळसर डाग किंवा गाळ साचतो. यासाठी टॉयलेटची स्वच्छता कशी करायची ते या वेबस्टोरीतून जाणून घ्या.
स्वच्छता राखण्यासाठी बर्फाचे तुकडे आणि मीठ तुम्ही वापरू शकता.
जाड मीठ हे नैसर्गिक आणि सौम्य स्क्रब म्हणून काम करते, ज्यामुळे भांड्यावर चिकटलेली घाण आणि गाळ सैल होण्यास मदत होते.
बर्फाचे तुकडे टॉयलेटच्या टाईल्सवर साचलेला थर, डाग कमी करतात.
टॉयलेटच्या भांड्यातसाधारण १ कप बर्फाचे तुकडे टाका.
त्यावर २ ते ३ मोठे चमचे जाड मीठ पसरवून टाका.
हे मिश्रण भांड्यातील घाण सैल होण्यासाठी ५ ते १० मिनिटे तसेच राहू द्या.
यानंतर टॉयलेट क्लीनर किंवा जंतुनाशक घालून टॉयलेट ब्रशने नीट घासून स्वच्छ करा आणि शेवटी फ्लश करा.